ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

वादळी वारा अन् “मान्सूनपूर्व’ने चार दिवसांत दुसऱ्यांदा अहिल्यानगरला झोडपले:आतापर्यंत 5.7 मिमी पावसाची नोंद, पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मागील चार दिवसांत दोन वेळा वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने शहर, जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी ७ वाजता सुरु झालेला पाऊस तासभर सुरुच होता. वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांत ५.७ मिमी पाऊस झाला. दरम्यान हवामान विभागाने पुढील ४ दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. एप्रिल व मे महिन्यातील पहिले ३ आठवडे तापमान वाढ कायम होती. मात्र २७ मे पासूनच वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली होती. २८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. १ जूनपासून मात्र मान्सूनपुर्व पावसाचे ढग दाटून येत होते. मात्र तुरळकच पाऊस झाला होता. १ ते ३ जूनपर्यंत ५.७ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी संपुर्ण मे महिना हा अवकाळीचा पावसाचा ठरला होता. मे ते सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यात मान्सूनपुर्व पावसावर खरीपाचे भवितव्य ठरत असते. गेल्या ४ दिवसांपासून तुरळक सुरु असलेल्या पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. शहरासह केडगाव, नालेगाव, भिंगार, पाईपलाईनरोड, नागापूर या भागात बुधवारी रात्री वादळी पाऊस झाला.त्यामुळे बहुतेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच वीज देखील गुल झाली होती. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील ५ दिवस म्हणजेच ३ जून ते ७ जून या कालावधीत हवामानात मोठा बदल होणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यासाठी मान्सूनपूर्व पाऊस हा महत्वाचा असतो. यंदा मे महिन्यातील शेवटच्या दिवसांत वाढलेले तापमान हे या मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक ठरले. त्यामुळे मान्सूनपुर्व पाऊस होत आहे. यंदा १० ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे आगमन होईल. या अगोदर मात्र होणारा मान्सूनपूर्व पाऊस वादळी-वारे, विजांचा कडकडाट होणार आहे. मध्यम पावसाची शक्यता वाढलेले तापमान ठरले मान्सूनपूर्वसाठी पोषक

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर