ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वेतनच मिळाले नाही; प्रभाग क्रमांक 1 मधील स्वच्छता कर्मचारी संपावर:17 जून उजाडली तरीही अनेक कर्मचारी वंचित‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रभाग क्रमांक १ मध्ये कंत्राटदार कंपनीकडे कार्यरत असलेल्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अजूनही न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १७) सकाळी कामबंद आंदोलन केले. वेतनाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रत्यक्ष काम करण्यास नकार दिला. प्रभाग क्रमांक १ मध्ये कोणार्क कंपनीचे सुमारे ७० स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी काही कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले असले तरी बहुतांश कर्मचारी अद्यापही वेतनापासून वंचित आहेत. एक महिना पूर्ण होऊन दुसऱ्या महिन्याची १७ तारीख उजाडली. तरीही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे हजेरीसाठी उपस्थित झाले. मात्र वेतन न मिळाल्याने त्यांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रभागाचे नगरसेवक गुड्डू धर्माळे यांनी सकाळीच मनपा आयुक्त वर्षा ठाकूर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यांनी परिस्थितीची माहिती दिली. आयुक्तांनी लवकरच या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गुरुवारी प्रभाग क्रमांक १ मधील स्वच्छता सेवा नियमित राहणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा परिणाम परिसरातील स्वच्छतेवर होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वेतन वेळेवर मिळायलाच पाहिजे; निर्णय घ्यावा नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांना हक्काने स्वच्छतेविषयी कामे सांगत असतो. ती कामे कर्मचारी करतात. त्यामुळे त्यांना वेळेवर वेतन मिळणे अपेक्षित आहे. वेतन न मिळाल्याने त्यांनी काम बंद केले. यासंदर्भात मी सकाळी साडेसहा वाजताच मनपा आयुक्तांना फोन करून माहिती दिली होती. – गुड्डू धर्माळे, नगरसेवक.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर