ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


घातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदे) याला अखेर श्रीगोंदे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. श्रीगोंदे पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यापासून सुभाष चौधरी अटक टाळण्यासाठी सतत ठिकाणे बदलत होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष पथक नेमून त्याचा शोध सुरू केला होता. या पथकाने श्रीगोंदे, काष्टी, दौंड, यवत, बारामती, पाटस, पुणे आणि कोल्हापूर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे अनेकदा शोधमोहीम राबवली; मात्र तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार तपास सुरू असताना, पोलिसांना आरोपीच्या ठावठिकाणाची माहिती मिळाली. सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चौधरीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत उपनिरीक्षक संजय वाघमारे, संदीप राऊत, वैजीनाथ कुटे, रवींद्र पाचारणे व बबन साळवे यांनी सहभाग घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर