ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जगन्नाथांना जलाभिषेक . इस्कॉन राधा-दामोदर मंदिरात भाविकांची मांदियाळी:आजपासून पंधरा दिवस भगवंताला वनौषधी काढा, डाळखिचडीचा प्रसाद

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर भगवान जगन्नाथ यात्रेस सोलापुरात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी देवाला जलाभिषेक केला जातो. जलाभिषेकामुळे भगवंत पंधरा दिवस आजारी पडतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवाच्या डोक्याला शाल बांधण्यात येते. दूध, हळद, दालचिनी, वनऔषधीपासून काढा दिला जातो. डाळ खिचडीचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. त्याच पध्दतीने सोलापुरातील जुना कुंभारी नाका येथील इस्कॉन मंदिरात रविवारी सकाळी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीला जलस्नान करण्यात आले. भजन सोहळा, प्रवचन सोहळा पार पडला. शेकडो साधकांची उपस्थिती होती. हरे रामा, हरे कृष्णा भजन गात भाविकांना आनंद देऊन गेला. मंगलदायी व चैतन्यदायी सोहळा होता. राधा- दामोदर यांच्या मूर्तीला विशेष शृंगार अलंकार पूजा करण्यात आली होती. सकाळी सात पासून भाविकांची मांदियाळी जमत होती. भजन सोहळ्यात वातावरण अतिशय वैभवशाली झाले होते. स्नान अभिषेक झाल्यानंतर भगवंताला सर्दी व ताप येत असल्याच्या भावनेतून आजपासून पंधरा दिवस त्याला शाल व कानटोपी बांधतात. दररोज वनौषधी काढा देण्याची आगळी-वेगळी परंपरा आहे. विश्रांतीनगर देवाची महापूजा करून मंगळवार ता. २२ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरापासून जगन्नाथ रथोत्सव साजरा केला जातो. भगवान जगन्नाथ यांच्यासाठी शाल व कानटोपी विणण्याची प्रथा आहे. वृंदावन- मथूरेतून सूत (दोरा) आणून भाविक त्या दोरीपासून टोपी व शाल विणतात. आज सकाळी आठ ते दहा वेळेत चंदन व सुंगधी द्रव्य वापरून देवाचा स्नान अभिषेक सोहळा पार पडला. आजचे महत्व विषद करणारे प्रवचन गोविंद भक्त दास (अमेरिका) यांचे झाले. यानंतर ५६ भोग महाप्रसाद झाला. भाविकांसाठी “दहिचिडा’ हा विशेष प्रसाद होता. पोहे, दही, केळी, आमरस घालून हा प्रसाद केला जातो. मंदिराचे अध्यक्ष कृष्णभक्तदास, पावन हरिनाम दास यांच्यासह भाविकांनी सोहळ्याचे आयोजन केले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर