Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

बिनविरोध निवडणूक हे भाजपचे सोयीचे राजकारण:काँग्रेसने वसंतराव चव्हाण अन् भालकेंच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीचा दिला दाखला

काँग्रेसने बिनविरोध निवडणूक करणे हे भाजपच्या सोयीचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर शरसंधान साधताना खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भारत भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप बिनविरोध निवडणूक करण्याच्या मुद्यावर केवळ आपल्या सोयीने राजकारण करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यात बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. या दोन्ही जागा अजित पवार व शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः मैदानात आहेत. त्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. पण काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार दिल्यामुळे येथे निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. भाजपने नेहमी आपल्याच सोयीचे राजकारण केले या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपवर आपल्या सोयीने राजकारण करण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे या प्रकरणी म्हणाले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज अ‍ॅडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीने भरणार आहेत, पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिप्पणी सुरू आहेत की काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे. मग नांदेडच्या वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जी आहे ती देता येईल, भाजपने सोयीने आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली. रिमाइंडर दिलं काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करत होते शेवटी कर्नाटक मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला. ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये.
मग त्याचा विचार करता येईल, मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे. काँग्रेसने संजय राऊतांनाही दाखवला आरसा दुसरीकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन सावंत यांनीही या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पत्रकार आणि राजकीय प्रवक्ते अशा दोन्ही भूमिका वठविताना सन्माननीय संजय राऊत यांची अनेकदा गल्लत होत असते. इतरांचे दोष दाखविण्याचा पत्रकार धर्म आणि राजकीय प्रवक्ते म्हणून दुसऱ्या पक्षांकडे बोट दाखविण्याची सवय यातून चार बोटे आपल्याकडे वळलेली आहेत याचा त्यांना सतत विसर पडतो. दुर्दैवाने आपण जे बोलतो तेच योग्य असा त्यांचा गैरसमज झाला आहे. आघाडी धर्मात इतर पक्षांचे मत असू शकते आणि त्यांच्याशी आधी चर्चा करणे गरजेचे आहे याची आवश्यकता वाटत नाही. एकतर्फी निर्णय जाहीर करायचे आणि नंतर काँग्रेसच्या नेत्यांना शोधायचे हे आघाडी धर्मात योग्य आहे का? असो! असे झाले नसते तर महाविकास आघाडीची मुंबई व चंद्रपूर महानगरपालिकेत आज सत्ता असती. आम्ही भाजपा विरोधात प्रामाणिकपणे लढत असल्याने आम्हाला त्यांच्याकडे वळलेली चार बोटे दाखविण्यात स्वारस्य नाही, असे ते म्हणालेत. “हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती,” असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!