ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

प्रगतिशील शेतकरी:निवृत्तीनंतर शेतात पिकवले 16 लाखांचे जगातील सर्वात महाग मियाझाकी आंबे; वाचा निवृत्त पोलिस अधिकारी किसन पाटील यांचा यशस्वी प्रयोग

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात असेल, तर मातीतून सोने पिकवता येते हे जळगावच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन नजन पाटील यांनी आपल्या चार वर्षांच्या अथक मेहनतीतून जपानमधील अत्यंत दुर्मिळ आणि जगातील सर्वात महागडा मानला जाणारा ‘मियाझाकी’ आंबा जळगावच्या मातीत यशस्वीपणे पिकवला आहे. पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल 8 किलो आंब्यांचे यशस्वी उत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या आंब्याला प्रति किलो 3 लाख रुपयांपर्यंतचा उच्चांकी भाव मिळतो. भारताला याला दीड ते दोन लाख रुपये किलोचा भाव मिळतो. निवृत्तीनंतर शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा निश्चय पाटील यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी देशातील विविध नामांकित नर्सरींना भेटी दिल्या. या शोधमोहिमेदरम्यान त्यांना हैदराबाद येथील एका नर्सरीमध्ये ‘मियाझाकी’ आंब्याचे रोप आढळले. अत्यंत महागडे म्हणजेच प्रति रोप 10,000 रुपये या दराने त्यांनी 4 वर्षांपूर्वी 3 रोपे विकत आणली. अत्यंत प्रतिकूल हवामानातही योग्य काळजी, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियमित सिंचन व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी ही झाडे जगवली. यंदा या झाडांना पहिलाच बहर आला आणि 8 किलो फळांचे दर्जेदार उत्पादन हाती आले. हा आंबा गडद लाल-जांभळ्या रंगाचा आणि अंड्यासारख्या आकाराचा असून, जपानमध्ये याला ‘ताइयो-नो-तामागो’ म्हणजेच ‘सूर्याचे अंडे’ असेही म्हणतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील भोसी गावच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याने फिलिपाइन्समधून रोपे मागवून याची यशस्वी लागवड केली.
हा आंबा प्रामुख्याने जपान, सौदी अरेबिया, दुबई आणि युरोपीय देशांमध्ये ‘लक्झरी गिफ्ट’ किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून कॉर्पोरेट जगतात भेट देण्यासाठी खरेदी केला जातो. भारतात या आंब्याला मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या मेट्रो शहरांमधील पंचतारांकित हॉटेल्स, हाय-एंड एक्झॉटिक फ्रूट मार्केट किंवा थेट ऑनलाइन ऑर्डर्स (जसे सौदी किंवा इतर देशांतून थेट शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऑर्डर्स) याद्वारे बाजारपेठ मिळत आहे. आंब्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स, बीटा-कारोटिन आणि फॉलिक ॲसिड असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. असे आहे खर्च-उत्पन्नाचे गणित मियाझाकी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. पाटील यांनी प्रतिनग 10 हजारांप्रमाणे तीन रोपे आणली. पहिल्या बहरात आठ किलो आंबे आले. भारतीय बाजारात याला दीड ते दोन लाख रुपये प्रतिकिलो दर मिळतो. पण यंदा पहिल्या बहरातील आंबे विकण्याऐवजी त्यांनी कुटुंब आणि मित्रमंडळींमध्ये ते आंबे भेट दिले. या आंब्याला अमेरिका, इंग्लड, सौदी, दुबई येथेच मोठी मागणी आहे. पुढील वर्षी आंबा निर्यात करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रगतिशील शेतकरी किसन पाटील यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 7350515858 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर