ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम मंदिरात श्री रामाला ‘सोन्याच्या मिशा; शेगावात दिंड्या दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आज चैत्र शुद्ध नवमी… अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. चैत्र नवरात्रीची सांगता आणि प्रभू रामांच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच राज्यातील राम मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ‘जय श्रीराम’ आणि ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला असून, गावागावांत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. राम नवमीनिमित्त आज पुणे शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत शहरातील बाजीराव रोड आणि लष्कर (कॅम्प) परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार असून काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. असे असतील बदल बाजीराव रोड: पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनधारकांनी टिळक रोड – अलका टॉकीज – खंडोजी बाबा चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. लष्कर विभाग: वाय जंक्शन येथील वाहतूक बंद राहील. एम.जी. रोडवरील वाहने १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येतील, तर महंमद रफी चौकातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे जाईल. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकमार्गे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. शेगावमध्ये ७५० हून अधिक दिंड्या दाखल शेगावमध्ये आज १३२ वा श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त श्रींच्या मंदिरावर मनमोहक रोषणाई करण्यात आली असून राज्यभरातून ७५० हून अधिक भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या आहेत. दुपारी श्रींची पालखी, रथ आणि अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघणार असून सायंकाळी ६ वाजता मंदिरात परतेल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी ‘एकेरी मार्ग’ (One-way) निश्चित करण्यात आला आहे. काळाराम मंदिरात प्रभू रामाला ‘सोन्याच्या मिशा पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना ‘सोन्याच्या मिशा’ लावून अनुपम शौर्य शृंगार करण्यात आला आहे. अरण्यकांडातील १४ हजार राक्षसांच्या वधाचे आणि प्रभूंच्या अजोड पराक्रमाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा ते द्वादशीपर्यंत हे विशेष रूप सजवले जाते. पेशवेकालीन या मंदिरात प्रभूंच्या या विलोभनीय दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बेलापूरचा रामनवमी उत्सव अन् ‘बेलापूर श्री’ कुस्तीचा थरार बेलापूर गावात २०० वर्षांची परंपरा असलेला रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. ‘राम जन्मला’च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला असून, रात्री निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. हनुमान जन्मोत्सवापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता भव्य जत्रेने होईल, जिथे लाल मातीतील कुस्त्यांच्या जंगी फडात ‘बेलापूर श्री’ हा मानाचा किताब प्रदान केला जाईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर