ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकत नाहीत:ऑपरेशन टायगर’ हा ठाकरेंचा अंतर्गत वाद, भाजप-शिवसेनेचा संबंध नाही- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ऑपरेशन टायगर हे उबाठामधील अंतर्गत वादामुळे झाले आहे. त्याचा आणि भाजप, शिवसेनेचा काहीही संबंध नाही. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राऊत यांच्या भाषेमुळे सर्व काही सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तुम्ही कोणाला धमकावत असाल तर तुम्हाला जशाच्या तसे उत्तर दिले जाईल हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की, पैसे देऊन खासदार विकत घेता येत नाही. तसे असते तर कोरोनाच्या काळात दररोज 100 कोटी रुपये उद्धव ठाकरेंकडे येत होते. त्यांच्याकडे साडे 9 लाख कोटी रुपये जमा आहे, हे पाच काय पन्नास खासदार विकत घेऊ शकतात. पैशाने माणसं विकत घेता येत नाही. त्यासाठी आपुलकी आणि प्रेम लागत असते. मातोश्रीचे दरवाजे बंद असल्याने लोकांनी आता उबाठासाठी दरवाजे बंद केले आहेत. शरद पवार गटाचे राजकारणच गटातटाचे नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारणच तटागटात सुरू आहे. राऊत पत्रकारांवर चिडतात कारण त्यांच्याकडे काहीच उरले नाही. शिवसेना संपवण्याचे काम राऊत करत आहे. शपथा घेऊन माणसं टिकत नाहीत नवनाथ बन म्हणाले की, आई-बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकवता येत नाहीत. उबाठाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नीट सांभाळले असते तर त्यांच्यावर ही वेळ आज आली नसते. खासदारांनी कोणाची शपथ घेतली हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आमच्या वडिलांचे विचार सोडले म्हणून आमची ही अवस्था झाली हे सांगायला सुरूवात करा. येणाऱ्या काळात तुमची अजून वाईट अवस्था होणार आहे. राऊतांनी गाढव नाक्यावर गाढव पणा करावा हेच तुमच्या हाती उरले आहे. उबाठाची ही अवस्था राऊतांमुळेच नवनाथ बन म्हणाले की, 2019 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नावावर सर्व आमदार, खासदार निवडून आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर विधानसभा लढलात त्यावेळी राजीनामा द्या असे काही तुम्हाला सूचले नाही का? राजीनामा द्या असे कोणाला सांगण्याची तुमची पात्रता नाही. तुम्ही काही करू शकत नाही. उबाठाच्या या अवस्थेला राऊतच जबाबदार आहेत. राऊतांनी बोलावले तर काळं कुत्र सुद्धा येणार नाही. दुसऱ्यांना राजीनामा मागण्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या मतावर निवडून आलेल्या राऊतांनी राजीनामा द्यावा. राऊत काहीही व्यक्तव्य करत असतात लोकं त्यांना गांभीर्याने घेत नाही. अंधारे नव्या पक्षाच्या शोधात नवनाथ बन म्हणाले की, सुषमा अंधारे या 12 पक्ष फिरून मग उबाठामध्ये आल्या आहेत. त्यांनी अनेक पक्षांचे पद बकासुरासारखे गिळले आहेत.आपण स्वत: बकासुर आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे. आता तुम्ही उबाठासोडून दुसरीकडे जाणार असल्याची माहिती आहे. तुम्ही लोकांना नावे ठेवू नये.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर