ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत:त्यांच्या बोलण्यात वास्तव नाही, महापौर पदाच्या विधानावरुन नारायण राणेंची खोचक टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. “उद्धव ठाकरे सध्या डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलतात त्याला वास्तवाचा कोणताही आधार नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” अशा बोचऱ्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने यश मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. ठाकरे बंधुंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंच्या या सूचक विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले नारायण राणे? उद्धव ठाकरे यांनी ‘देवाच्या इच्छेने महापौर आमचाच होईल’ असे विधान केले होते. त्यावर टोला लगावताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहत आहेत, पण त्यांनी देवाला आतापर्यंत कधी जोडलेच नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मग तुमचा महापौर कसा होणार? एकदा संख्याबळ तपासून बघा. एवढा मोठा फरक तुम्ही कसा भरून काढणार? त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का?” ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला. “सुरुवातीला जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते, तेव्हा ते काही करू शकले नाहीत. वेगळे झाल्यावरही त्यांना काही करता आले नाही आणि आता पुन्हा एकत्र येऊनही ते काही करू शकले नाहीत. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवल्यामुळे आता नफा-तोटा काय असतो, याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत आहे. त्यांची शिवसेना आता फक्त नावाला उरली आहे,” असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंना दिला घरी बसण्याचा सल्ला राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहताय का? पण देवाला आतापर्यंत कधी जोडले नाहीत. त्यांनी संख्या बघावी. त्यांचा महापौर कसा होणार? त्यामुळे उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत. ते बोलतात ते वास्तव नाही. भाजप, शिवसेना शिंदे युतीची महाराष्ट्रातील जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये सत्ता आली आहे. आता तरी शहाणे बनून घरी बसावे आणि जे ऑपरेशन करायचे ते करून घ्यावे”, असा बोचरा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर