ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरेगाव येथे एकत्र येत शासनाच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” जाहीर केली असली तरी त्यामध्ये अनेक अटी व शर्ती लावून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात कर्जमाफी नसून “कर्ज वसुली योजना” असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यावेळी बोलताना गजानन कावरखे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे जाहीरपणे सांगितले गेले होते. मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयात विविध निकष आणि अटी लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने आपल्या आश्वासनाचा मान राखून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शेतकरी हिताच्या नावाखाली फसवणूक सहन केली जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, उद्धव कावरखे अनिल कावरखे, मारुती लाखोळे, अमोल एकशिंगे, विठ्ठल सावके, नामदेव काळे, अशोक कावरखे, प्रकाश भुरभुरे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर