ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

राजकीय संघर्ष:महाडिकांवर समाज माध्यमात टीका, सुस्तेत तरुणांच्या दोन गटात हाणामारी, लावणी कार्यक्रमातील धुसफूस; लाठ्या-काठ्यांनी थेट हल्ला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील सुस्ते येथे दि.२२ मे रोजी सकाळच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्य आणि समाज माध्यमावरील वादातून अत्यंत थरारक आणि गंभीर अशी फ्री-स्टाईल हाणामारी झाली. नृत्यांगना राधा पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात आधीच सुरू असलेल्या धुसफुशीत, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर समाज माध्यमावर करण्यात आलेल्या एका टीकात्मक टिप्पणीची भर पडली. यावरून दोन्ही बाजूंच्या युवकांमध्ये जोरदार वाद पेटला आणि त्याचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाले. प्राथमिक माहितीनुसार, खासदार धनंजय महाडिक यांच्यावर समाज माध्यमावर एक उपरोधिक व टीकात्मक पोस्ट टाकण्यात आली होती. या पोस्टवर सुस्ते गावातील दोन्ही गटांतील तरुणांनी एकमेकांना आव्हान देणाऱ्या आणि चिथावणीखोर कॉमेंट्स करण्यास सुरुवात केली. कमेंट्सचा हा वाद इतका टोकाला गेला की, शुक्रवारी सकाळी दोन्ही गट समोरासमोर आले. एकमेकांना बघून घेण्याच्या ईर्षेतून तरुणांनी थेट लाठ्या- काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या भीषण हाणामारीत भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तात्यासाहेब नागटिळक यांचा मुलगा आकाश नागटिळक, त्यांचे जावई युवराज चव्हाण, भाऊ धनाजी नागटिळक आणि कार्यकर्ते रामदास चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यादरम्यान आकाश नागटिळक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेबाबत पंढरपूर तालुका (ग्रामीण) पोलिस ठाण्यात अद्याप अधिकृतपणे कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता असा संशय व्यक्त केला जात आहे. या हाणामारीत विरोधी गटाने केवळ लाठ्या-काठ्यांसह केमिकल किंवा मिरचीच्या स्प्रेचा वापर केला. तसेच लोखंडी फायटर वापरण्यात आले असल्याचे सांगितले जाते. नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमात पडलेली वादाची ठिणगी आणि त्यानंतर राजकीय कमेंट्समुळे लागलेला हा भडका यामुळे सुस्ते गावात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे. गावात पुन्हा कोणताही अनुचित प्रकार किंवा प्रतिहल्ला घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १५ दिवसांपूर्वी पडलेली वादाची ठिणगी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर