ब्रेकिंग न्यूज
Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु… बाबापुरच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तीचा ओघ वाढतोय! Nigar Sultana : हरमनप्रीतशी पंगा पडला भारी! बांगलादेशच्या कॅप्टनची तातडीने हकालपट्टी, सेमीफायनलमध्ये काय घड… गृहिणी बनली उद्योजिका, 700 कोंबड्यांपासून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला 3 लाखांची उलाढाल, Video
SP News Maregaon

भट्टी सुरूच होती अन्…; बिर्याणीचा सुगंध अचानक भयनाक दुर्घटनेत बदलला, पुण्यात बिर्याणी हाऊसमध्ये तरुणाचा ह…

9 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : वाकड-डांगे चौक रस्त्यावरील एका बिर्याणी हाऊसमध्ये रविवारी रात्री आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. हॉटेलमध्ये गॅस सिलिंडर बदलत असताना अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला. या थरारक दुर्घटनेत एका १९ वर्षीय निष्पाप कर्मचाऱ्याचा धुरामुळे गुदमरून आणि गंभीर भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाकड येथील सुखवानी सिटी संकुलात ‘नवी दिल्ली ६ बिर्याणी हाऊस’ आहे. रविवारी रात्री हॉटेलमधील गॅस संपल्याने नवीन सिलिंडर जोडण्याचे काम सुरू होते. मात्र, त्याच वेळी शेजारीच असलेली हॉटेलची मुख्य भट्टी देखील धगधगत होती. सिलिंडर जोडत असताना अचानक गॅसची मोठी गळती झाली आणि भट्टीच्या संपर्कात येताच आगीचा प्रचंड भडका उडाला.

आगीची ठिणगी पडताच सिलिंडर जोडणारा कर्मचारी प्रसंगावधान राखून तात्काळ बाहेर पळाला. मात्र, तिथेच काम करत असलेला १९ वर्षांचा तरुण शेहजाद शेख (मूळ रा. उत्तर प्रदेश) हा आगीच्या वेढ्यात आणि धुराच्या लोटात आतच अडकून पडला. आगीच्या भीषण धुरामुळे शेहजादचा श्वास गुदमरला आणि तो गंभीररित्या भाजला गेला. त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बिर्याणी हाऊसला लागलेल्या या भीषण आगीच्या ज्वाळा पाहून शेजारीच असलेल्या एका बारमधील ग्राहकांमध्ये एकच धांदल आणि घबराट उडाली. स्थानिक व्यावसायिकांनी तात्काळ तत्परता दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच थेरगाव आणि रहाटणी येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी तीन बंबांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

पोलीस तपासात समोर आले आहे की, या हॉटेलचे मूळ मालक मोहम्मद उस्मान (वय ३८, रा. तळेगाव, मूळ फरिदाबाद) यांनी हे हॉटेल फरहान (वय ३५) आणि त्याचा भाऊ (मयत) शेहजाद शेख यांच्याकडे चालवण्यासाठी दिले होते. याप्रकरणी वाकड पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर