ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

वन्य प्राण्यांची तहान पाणवठ्यांवर:१९ पाणवठ्यांमध्ये भरले जात आहे पाणी, २ हजारांहून अधिक वन्य प्राण्यांना दिलासा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सध्या वाढत्या उष्णतेमुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वन विभागाने तातडीने पाणवठे पाण्यांनी भरण्यास सुरुवात केली असून त्यामुळे जिल्हयात सुमारे २ हजार पेक्षा अधिक वन्य प्राण्यांची तहान भागवली जाऊ लागली आहे. जिल्ह्यातील १९ पाणवठ्यांमधून दररोज पाणी भरले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या सुमारे २ हजार पेक्षा अधिक आहे. यामध्ये प्रामुख्याने रोही, हरीण, काळवीट, माकड, रानडुक्कर या प्राण्यांचा समावेश असून इतर लहानमोठे प्राणी देखील जंगलांमधून आहेत. सध्या उन्हाळा वाढू लागला असून त्यामुळे तहानलेले वन्य प्राणी गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगलामध्येच पिण्याची पाणी मिळावे यासाठी वन विभागाने १९ ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांची विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने सर्वच ठिकाणी पाहणी करून आवश्‍यक त्या ठिकाणी पाणवठ्यांची दुरुस्ती केली आहे. दरम्यान, या पाणवठ्यांमधून आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी भरले जात आहे. या पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी वन्य प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे या पाणवठ्यांसाठी दररोज किमान आठ ते दहा ट्रॅक्टर पाणी लागत असल्याचे चित्र आहे. वन विभागाकडून दररोज पाहणी करून रिकामे झालेल्या पाणवठ्यामध्ये पाणी भरले जात असल्याने वन्य प्राण्यांची तहान भागत असल्याचे चित्र आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर