ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

इतिहासाचा जिवंत साक्षीदार:नेवासे नगरपंचायतीत जपलाय 73 वर्षे जुन्या लाकडी कपाटाचा वारसा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एखादी वस्तू केवळ उपयोगापुरती मर्यादित न राहता इतिहासाची जिवंत साक्षीदार कशी ठरू शकते, याचे उदाहरण सध्या नेवासे नगरपंचायत कार्यालयात पाहायला मिळत आहे. येथे ७३ वर्षे जुने एक लाकडी कपाट आहे. त्याला १९५३ सालचे कॅलेंडर आतून चिकटवलेले आहे. आठवणी जपणारा हा ऐतिहासिक ठेवा आजही शासकीय कारभारात निष्ठेने कार्यरत आहे. विशेष म्हणजे, हा ऐतिहासिक ठेवा सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांच्या शोधक नजरेला प्रथम पडला आणि त्यातूनच या कपाटाच्या इतिहासाचा रंजक पट उजेडात आला. नेवासे खुर्द येथे २१ मार्च १९४० रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर प्रशासकीय कामकाजाची सुरुवात झाली होती. त्यानंतर १९५३ पासून हे लाकडी कपाट कार्यालयीन वापरात असल्याचे मानले जाते. त्या काळापासून आजपर्यंत अनेक सरपंच, ग्रामसेवक आणि शेकडो कर्मचारी बदलले, मात्र या कपाटाने प्रशासनाच्या प्रत्येक टप्प्याला शांतपणे साथ दिली आहे. सन २०१६ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर ‘नेवासा नगरपंचायत’ मध्ये झाल्यानंतर सर्व जुने दस्तऐवज, नोंदी आणि साहित्यासह हे ऐतिहासिक कपाटही नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाले. सध्या जनगणना लिपिक राजेश्वर सोनवणे हे आपल्या दैनंदिन कामकाजासाठी या कपाटाचा नियमित वापर करीत आहेत. आधुनिक काळातील लोखंडी व डिजिटल कपाटांच्या जमान्यातही या लाकडी कपाटावरील मूळ खिळे, चाव्या ठेवण्यासाठी केलेली जुनी व्यवस्था तसेच कपाट बंद करण्यासाठी वापरला जाणारा पारंपरिक लाकडी कोंडा आजही जशाच्या तसा टिकून आहे, हीच या कपाटाची सर्वात मोठी खासियत ठरली आहे. दशकानुदशके प्रशासकीय बदल पाहणारे हे कपाट केवळ एक फर्निचर नसून नेवासे शहराच्या प्रशासकीय इतिहासाचा जिवंत दस्तऐवज बनले आहे. काळ बदलला, व्यवस्था बदलल्या, पण या कपाटाने मात्र आपली उपयोगिता आणि ओळख कायम ठेवली आहे. हे कपाट प्रशासकीय परंपरेची आठवण हे कपाट आपल्या प्रशासकीय परंपरेची अत्यंत अमूल्य आठवण आहे. कपाटाची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता, पुढील शंभर वर्षांपर्यंतही त्याचे योग्य पद्धतीने जतन करण्याचा आमचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान आणि जनगणना लिपिक राजेश्वर सोनवणे यांनी दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर