ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

तुकाईमाता डोंगरावर तीन हजारांहून अधिक बिजारोपण:आव्हाड महाविद्यालयाचा उपक्रम, पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – प्राचार्य चौरे‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या वतीने हंडाळवाडी शिवारातील तुकाईमाता डोंगर परिसरात विविध प्रजातींच्या वनस्पतींचे बिजारोपण करण्यात आले. यामध्ये लिंब, करंज, गुलमोहर, जांभूळ, सीताफळ, चिंच, बोर आदी वनस्पतींच्या बियांचा समावेश होता. या उपक्रमांतर्गत डोंगर परिसरात सुमारे तीन हजारांपेक्षा जास्त बिजारोपण करण्यात आले. या बिजारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाचे विश्वस्त कुणाल आव्हाड, प्रकाश दिवटे, पर्यवेक्षक प्रा. सलीम शेख, डॉ. अर्जुन केरकळ, डॉ. अशोक डोळस, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, डॉ. विजय देशमुख, प्रा. विजय म्हस्के, प्रा. शरद बोडके, प्रा. शेखर ससाने, प्रा. सचिन शिरसाट, प्रा. सुधीर सुडके, प्रा. सचिन वनवे, प्रा. खंडेराव डोईफोडे, प्रा. अनिल नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बबन चौरे म्हणाले, जमिनीची धूप थांबवण्यासाठी वृक्ष अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. सध्या होत असलेल्या प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत चालला आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावरणातील अनेक औषधी वनस्पती नष्ट होत असून वन्यजीवांचे प्रमाणही चिंताजनक रीतीने घटत आहे. पुढे बोलताना त्यांनी प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांमुळे सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. मानवी स्वास्थ्य टिकवून ठेवायचे असेल तर पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन करणे अत्यंत आवश्यक असून, प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून त्याची काळजी घेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. या यशस्वी उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुण राख, डॉ. आनंद घोंगडे आणि एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर