ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

वादळी पावसाचा तडाखा; झाडे, वीज खांब कोसळले:वीज खांब पडल्याच्या तसेच फ्लेक्स बोर्ड उडाल्याच्या घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी​|अहिल्यानग र ​अहिल्यानगर शहरात रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. जोरदार वारे आणि पावसाच्या सरींमुळे शहराच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या, वीज खांब पडल्याच्या तसेच फ्लेक्स बोर्ड उडाल्याच्या घटना घडल्या. ​शहरात सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा होता. दिवसभर उन्हाचा चटका बसल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, रात्री अचानक वातावरणात बदल झाला आणि आकाशात ढग दाटून आले. रात्री साडे आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की, अनेक ठिकाणचे फ्लेक्स वाऱ्याने उडून रस्त्यावर आले, तर कोठला परिसरात विजेचा खांब पडला. दरम्यान, श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद, सरला, गोवर्धन, रामपूर गळनिंब, फत्याबाद, उक्कलगाव, बेलापूर खुर्द, बेलापूर बुद्रुक, पढेगाव आदी गावांत वादळीवाऱ्यासह गारपीट झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर