ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जि.प.च्या सर्वच मतदारसंघासाठी तयारी करून ठेवा- सरनाईक:शिवसेना कार्यकारिणी बरखास्तीनंतर प्रथमच मेळावा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आगामी जिल्हा परिषदेसह अन्य निवडणुका शिवसेना (शिंदे गट) युती म्हणूनच लढणार आहे; मात्र सर्वच मतदारसंघांसाठी तयारी करून ठेवा, असे म्हणत पक्षाचे संपर्क मंत्री प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे संकेत दिले. ते सोमवारी मतदार विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर बीएलए (बूथ लेव्हल एजंट) प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. मेळावा गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. एसआयआरमध्ये अमरावती जिल्हा अकोल्यापेक्षा पुढे असून कामात सुधारणा करणे आवश्यक असल्याचेही सरनाईक म्हणाले. शिवसेनेच्या शिंदे गटाची कार्यकारिणी बरखास्तीनंतर सोमवारी प्रथमच मेळावा झाला. लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख तथा माजी आमदार डॉ. राजन साळवी यांनी प्रास्ताविक करून भूमिका विशद केली. सरनाईक पुढे म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिकाने संघटन विस्ताराचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवा. विरोधकांच्या अपप्रचाराला तोंड द्या. शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण गावागावात, वॉर्डावॉर्डात आणि प्रत्येक मतदान केंद्रावर सन्मानाने रोवला गेला पाहिजे, असे आवाहन सरनाईक यांनी केले. बीएलओंसोबत बीएलएंनी काम करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. यादीमधील तफावत दूर झाल्यास मतदारांची अंतिम यादी व्यवस्थित तयार होईल. कोणीही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही, असे माजी आमदार तथा संपर्क नेते गोपिकिशन बाजोरिया म्हणाले. व्यासपीठावर माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, राजेश मिश्रा, श्रीरंग पिंजरकर, अश्वीन नवले, विठ्ठल सरप, मंगेश काळे, संतोष अनासने, विदर्भाचे प्रवक्ते प्रकाश डवले, रेखा राऊत, अनिल मालगे आदी होते. सूत्रसंचालन योगेश अग्रवाल यांनी केले. सन २००२नंतर यंदा २०२६मध्ये { उर्वरित पान ४ नियुक्तीवरुन होणार रस्सीखेच विविध शासकीय समित्यांवर नियुक्तीसाठी यादी तयार करण्याचा आदेश संपर्क मंत्री सरनाईक यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. ही यादी पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यापूर्वी जिल्ह्यात समित्यांवर नियुक्तीवरून प्रचंड वाद झाले होते. स्थानिक नेत्यांमध्ये आपल्या समर्थकांची वर्णी लागावी, यासाठी रस्सीखेच झाली होती. याद्याही बदलण्यात आल्या होत्या. सध्या तर कार्यकारीणीच अस्तित्वात नाही. त्यामुळे कोणाला नवीन कार्यकारीणीत स्थान द्यायचे व कोणाला समित्यांवर संधी द्यायची, याबाबतचा निर्णय घेताना पक्ष श्रेष्ठांचा कस लागणार आहे. हा निर्णय सर्वसमावेशक न झाल्यास पुन्हा पक्ष संघटनेत फुट पडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर