ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

हिंगोलीत भाजपने निष्ठावंतांना डावलले:उपऱ्यांना पदे मिळाल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ, पण पक्षशिस्तीमुळे सर्वांचे तोंडावर बोट

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हा भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना पदे देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी वेळ आल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हयात भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढत असल्याचे बोलले जात असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र चांगलीच अस्वस्थता दिसून येऊ लागली आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे इतर पक्षातून येणाऱ्यांची स्वागत केले जात आहे. काही दिवसांपुर्वीच कळमनुरीच्या एका नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आला. मात्र पक्ष प्रवेश होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत याची कानोकान खबरही स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या एका नेत्याला देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले. राज्य पातळीवरील या घडामोडी घडल्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये भाजपाच्या सहसंपर्क प्रमुख रेखा कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या ते पदाधिकारी इतर पक्षांतून भाजपात नुकतेच आले होते. त्यांचे पक्षात कोणतेही काम नसतांनाही त्यांना पदे बहाल करण्यात आली तसेच नगर पालिका निवडणुकीतही स्विकृत सदस्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची शहर, जिल्हा कार्यकारीणीवर वर्णी लावली जात असतांना निष्ठावंतांना मात्र डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजापच्या निष्ठावंतांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर