ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

मुंबई, पुणे महापौर कार्यालय अन् RSS मुख्यालय उडवून देऊ:खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने धमकीचे ईमेल; अहमदाबाद, गांधीनगरमध्येही दिला इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई-पुण्याचे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील संघ मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज 10 जून ते 20 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या गंभीर धमकीचे ईमेल मिळावलेत. खालिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे संवेदनशील भागांत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाठवण्यात आलेल्या या धमकीच्या ई-मेलमध्ये केवळ मुंबई-पुणे महापौर कार्यालयच नव्हे, तर नागपूरमधील काही संवेदनशील ठिकाणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय देखील लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या धमकीमध्ये आयईडी बॉम्बस्फोटाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, हा घातपात घडवून आणण्यासाठी काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संशयास्पद संदर्भ या ई-मेलमध्ये देण्यात आला आहे. नेमके काय म्हटले ईमेलमध्ये या धमकीच्या ईमेलमध्ये अत्यंत पद्धतशीरपणे वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याच्या महापौर कार्यालयात दुपारी 1:11 वाजता, तर पुण्याचे विधान भवन आणि नागपूरमधील रेशीमबाग येथील आरएसएस मुख्यालय (डॉ. हेडगेवार भवन) येथे दुपारी 3:11 वाजता स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, 10 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुणे आणि नागपूरमधील आरएसएसच्या विविध शाखांना सकाळी 6:11 ते रात्री 9:11 च्या दरम्यान लक्ष्य केले जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
धमकीमागील हेतू स्पष्ट करताना ईमेलमध्ये राजकीय आणि ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. 1984 मधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘ऑपरेशन वूडरोझ’ला आरएसएस आणि भाजपने पाठिंबा दिला होता, ज्यामध्ये 20,000 शीख तरुण मारले गेल्याचा दावा यात करण्यात आला आहे. याच घटनेचा ‘बदला’ घेण्यासाठी आरएसएस आणि भाजप संपवण्याची करण्याची भाषा या ईमेलमध्ये वापरण्यात आली असून, हिंदूंनी आपल्या मुलांना वाचवावे, असा थेट इशारा वजा धमकीवजा संदेशही देण्यात आला आहे. या अत्यंत संवेदनशील ईमेलच्या शेवटी इंजि. गुरनाख सिंग, रुकन शाहवाला, डॉ. गुरनीर्वैर सिंग आणि खान राजाडा अशा चार व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपास सुरू धमकीचा हा ई-मेल मिळताच पुणे पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग तात्काळ सतर्क झाले आहेत. हा ई-मेल कोणत्या ठिकाणाहून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला, तो खरा आहे की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी पाठवलेला बनावट ई-मेल आहे, याची तांत्रिक तपासणी सायबर विभागाकडून वेगाने केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील इतर संवेदनशील परिसरात सुरक्षा आणि गस्त वाढवण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कसून तपासणीमध्ये संबंधित परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आलेले नाही. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. अहमदाबाद, गांधीनगरमध्ये धमकीचे ईमेल अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज 10 जून ते 20 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याच्या गंभीर धमकीचे ईमेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा धावपळ करू लागल्या. वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेल्या या धमक्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला दुपारी 1:11 वाजता, एएमसी कार्यालयाला दुपारी 3:11 वाजता आणि आरएसएस कार्यालयाला संध्याकाळी 5:11 वाजता स्फोटाने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ही धमकी खालिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने देण्यात आली आहे. तथापि, मुख्यमंत्री कार्यालयाची तपासणी पूर्ण झाली आहे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीसाठी दिल्लीला पोहोचले आहेत आणि याच दरम्यान ही धमकी मिळाली होती. गेल्या 25 मे, 2026 रोजी पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांना एक धमकीचा ईमेल मिळाला होता. ईमेलमध्ये दिलजीत दोसांझचे घर आणि लुधियानाच्या महापौर इंदरजीत कौर यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पद्धतीनुसारच आज CMO, RSS आणि AMC ला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. खालिस्तानी नॅशनल आर्मीनेच पाठवल्याचा उल्लेख आहे. फक्त धमकीसाठीचे ठिकाण बदलले आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या दाणापीठ येथील मुख्य कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमुळे तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. पोलीस, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड (BDDS) तसेच सायबर क्राईम टीमद्वारे ईमेलच्या स्त्रोताची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या दाणापीठ येथील मुख्य कार्यालयात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रतोद यांच्यासह मुख्य कार्यालयातील कर्मचारीही बाहेर आले आहेत. अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून इमारतीची तपासणी करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर