ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. महाराष्ट्रातील जनतेने त्यावेळीच त्यांना सत्तेबाहेर करून उत्तर दिले. त्यामुळे धमक्या आणि आव्हानांची भाषा करून राजकीय वास्तव बदलणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, टक्केवारी घेणं ही उबाठा आणि संजय राऊत यांची पंरपरा आहे. मराठी माणसांच्या घरात, त्यांना बेघर करण्यात आणि पत्राचाळीत तुम्ही टक्केवारी घेतली. खासदारांची टक्केवारी आणि ठेकेदारी तुम्ही काढू नका. कोरोना काळात कोणकोणत्या ठेकेदारीतून पैसे घेण्याचे काम तुम्ही केले आहे हे जनतेने पाहिले आहे. तुम्ही टक्केवारीची भाषाच करू नये. महाराष्ट्र तुमच्या धमक्यांना घाबरत नाही नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा शिवीगाळ केली. राऊतांच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही, हे कायद्याचे राज्य आहे, देवाभाऊ हे राज्याचे गृहमंत्री आहेत. अमित शहा यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली ते पहा, तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केले त्याकडे पहा असा टोला बन यांनी लगावला आहे. आपल्याच निवडून आलेल्या खासदांना कशी शिवीगाळ करतो हे बघायला हवे. मग इतरांना धमक्या द्या, महाराष्ट्र तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही जेवढी शिवीगाळ कराल तेवढीच जनता तुम्हाला नाकारेल. आधी राऊतांनी हिशोब द्यावा नवनाथ बन म्हणाले की, राऊत तुम्ही जी शिवीगाळ करत आहात त्याला कंटाळूनच तुमचे लोकं बाहेर पडत आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. राऊत गेली 25 वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत, तुमच्या खासदार निधीच्या मार्फत तुम्ही काय कामे केली, तुमच्या निधीतून महाराष्ट्र हिताचे एक काम तुम्ही केले का? एक शाळा बांधली का? एक रस्ता केला का याचा हिशोब आधी द्या आणि मग खासदांच्या निधीवर बोला. सपकाळांनी आत्मपरीक्षण करावे नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या काँग्रेसला स्वतःच्या संघटनेतच पाठिंबा उरलेला नाही. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित साथ मिळाली नाही. अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे भाजपवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील असंतोष आणि संघटनात्मक अपयशाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे ही वृत्त वाचा खासदारांचा मान-सन्मान म्हणजे 50 ते 75 कोटी रुपये:मतदारसंघाचा निधी पडून, मग विकास करायला तिकडे गेलात की कंत्राटं घ्यायला?- संजय राऊत संजय दिना पाटील यांनी काही बोलण्यापूर्वी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उद्धव ठाकरेंशी भांडण नव्हते तर त्यांनी पक्ष सोडायला नको होता. ज्यांच्याशी त्यांचे भांडण आहे त्यांच्यासंदर्भात मातोश्रीवर येत चर्चा करायला हवी होती. या सर्व गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही. ते हे का सांगत नाहीत की 13 तारखेला त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांचे खोके आले, त्यानंतर 14 तारखेला पुन्हा 5 कोटी रुपये आले मग मी दिल्लीतील पक्षाच्या बैठकीचा व्हीप धुडकावला आणि गायब झालो त्यानंतर मला उरलेले 35 कोटी रुपये मिळाले हे संजय दिना पाटील यांच्यासह सर्व गद्दारांनी सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर पैशांनी विकत घेता येणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत:पक्षांतराच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया, संजय राऊतांबद्दलही मोठं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना परभणीचे खासदार संजय हरिभाऊ जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच कार्यकर्ते पैशांनी विकत घेता येत नाहीत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर