ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न:अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा संताप, बदनामी करणाऱ्यांना नोटिसा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अशोक खरात प्रकरणावरून आपल्यावर आणि कुटुंबावर करण्यात आलेले आरोप अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न काही विकृत लोकांनी केला,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अनेकांना कायदेशीर नोटिसाही पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, अशोक खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी त्यांचा कधीही संबंध नव्हता. तसेच कोणत्याही महिलेला आपण खरात यांच्याकडे घेऊन गेलो असल्याचा आरोपही पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या कुटुंबीयांनी खरात यांना गुरुस्थानी मानले होते आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाद्यपूजेचा व्हिडीओही जुना असल्याचे त्यांनी सांगितले. बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई खरात प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा यासाठी आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता, याची आठवण करून देत चाकणकर म्हणाल्या की, आता त्यांची लढाई कायद्याच्या चौकटीतून सुरू राहणार आहे. सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमांतून बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून अनेकांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “विकृत प्रवृत्तीच्या लोकांविरोधातील ही माझी लढाई आहे. सत्य बाहेर येईल आणि कायद्याच्या माध्यमातून योग्य उत्तर दिले जाईल,” असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात आपली भूमिका पुन्हा अधोरेखित केली. त्यांच्या या भूमिकेमुळे अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाण्यात संतापजनक प्रकार!:किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर किरकोळ वादातून एका वृद्ध नागरिकाला ओला चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा व्यक्ती परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर