ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अर्ध्या गुंठ्यासाठी आई-वडिलांची निर्घृण हत्या:काच फोडून हातांच्या नसा कापल्या; माथेफिरू मुलाच्या कृत्याने कोल्हापूर हादरले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मालमत्तेच्या वाटणीच्या वादातून झालेल्या वादात एका माथेफिरू तरुणाने आपल्या आई-वडिलांची डोके ठेचून निर्घृणपणे हत्या केल्याची भयंकर घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. दीड गुंठ्याचा प्लॉट व त्यातील अर्ध्या गुंठ्याच्या वाटणीसाठी आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावात ही घटना घडली आहे. नारायण गणपतराव भोसले (82) व विजयमाला नारायण भोसले (70) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. तर सुनील नारायण भोसले (48) असे आरोपीचे नाव आहे. भोसले यांचा हुपरीत दीड गुंठ्यांचा प्लॉट आहे. त्यातील अर्ध्या गुंठ्याच्या वाटणीसाठी आरोपीने आपल्या आई-वडिलांची हत्या केली. महिन्याभरापूर्वीही केली होती मारहाण पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण भोसले व त्यांच्या पत्नी विजयमाला हे हुपरीच्या महावीर नगर येथे राहत होते. त्यांना चंद्रकांत, संजय व सुनील ही 3 मुले आहेत. पैकी चंद्रकांत व संजय हे दोघे नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. तर सुनील हा घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहतो. तो किरकोळ कारणांवरून आपल्या आई-वडिलांना नेहमीच शिवीगाळ करत मारहाण करत होता. महिन्याभरापूर्वीच त्याने त्यांना काठीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. पण माफी मागितल्यामुळे आई-वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली नव्हती. फुटलेल्या काचेने कापल्या हाताच्या नसा गुरूवारी रात्री भोसले दाम्पत्य आपल्या घरात झोपले होते. तेव्हा आरोपीने पहाटेच्यावेळी घरात प्रवेश केला. त्याने पहाटे 5.45 च्या सुमारास आपल्या आई-वडिलांवर हल्ला चढवला. त्यात त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लाकडाने प्रहार केला. त्यात घरातील शोकेसची काच फुटली. त्यानंतर त्याच काचेने त्याने आई-वडिलांच्या हातांचा नसा कापल्या. यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. आईच्या अंथरुणात तिचे तुटलेले मंगळसूत्र व फुटलेल्या बांगड्याचा खच पडला होता. हा आरडाओरडा एकूण त्यांचे शेजारी व चुलत वहिनी राजमाता यांनी झाल्या प्रकाराची माहिती फोनवरून संजय भोसले यांना दिली. त्यानंतर घरात नेमके काय घडले हे पाहण्यासाठी त्या त्यांच्या घरी गेल्या. तेव्हा आरोपी सुनीलने फरशीचा एक तुकडा त्यांना फेकून मारला. यामुळे त्या पळून गेल्या. त्यानंतर जिवाच्या भीतीने कुणीही भोसले यांच्या घराकडे गेले नाही. पुरावे नष्ट करण्याचाही केला प्रयत्न आई-वडिलांना ठार मारल्यानंतर सुनीलने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी बांबूचे दांडके, विळ्याचे पाते बाथरूममध्ये नेऊन धुतले. त्यानंतर आपल्या शेडजवळील दरवाजाच्या भिंतीजवळ नेऊन ठेवले. तद्नंतर तो घराचे गेट बंद करून आपल्या घराबाहेर निर्विकारपणे बसला होता. कुणी घराजवळ आल्यास त्यांच्यावर हल्ला करण्याचीही धमकी देत होता. त्यामुळे कुणीही तिकडे जाण्यास धजावत नव्हते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर