ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखी बनावट:आदित्य ठाकरेंचा घणाघात, राज्यसभेच्या जागेवरही ठोकला दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज शिवजयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली. विशेषतः दिल्लीतील ‘रोबोटिक कुत्र्या’च्या वादावरून त्यांनी राज्य सरकारची तुलना ‘बनावट’ कामांशी केली. यासोबत आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य करताना, एका जागेवर दावा ठोकला आहे. दिल्लीतील एआय (AI) एक्स्पोमध्ये गलगोटिया विद्यापीठाने विद्यार्थ्यांऐवजी चीनमध्ये बनवलेला ‘रोबोटिक कुत्रा’ स्वतःचा म्हणून प्रदर्शित केला. या वादाचा संदर्भ देत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. “सरकार खोदून काढायचे झाले तर सगळेच भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत. आजच्या सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट झाली आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराने पोखरलेले असून जगात आमची नाचक्की होत आहे,” अशी टीका त्यांनी केली. एआय समिटमध्ये पाणी, जेवणाची व्यवस्था नाही दिल्लीतील एआय समिटमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. जगभराचे लक्ष या समिटकडे आहे, पण तिथे पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही. कोणत्याही नेत्यांच्या फोटो तिथे लावले जात नाहीत, पण सरकारने नेत्यांची फोटो लावले, तिथे फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचे काम दाखवले जाते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई सुशोभीकरणाचा फज्जा मुंबईतील विकासकामांवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. “सुशोभीकरणाचा ९९ टक्के निधी केवळ सत्ताधारी लोकांशी संबंधित कंत्राटदारांकडे गेला आहे. मुंबईत एकही रस्ता पूर्ण झालेला नाही, पण अनेक ठिकाणी ‘डबल रंगरंगोटी’ करून पैसे लाटले जात आहेत. आमचे काम गलगोटियासारखे बनावट नाही. आम्ही जे करतो ते प्रत्यक्षात दिसते. असले ‘डुप्लिकेट’ काम फक्त हे ‘डुप्लिकेट’ सरकारच करू शकते,” अशा कठोर शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले. राज्यसभेच्या जागेवर ठोकला दावा आगामी राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी ‘रोटेशन’चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. सध्या ज्या चर्चा समोर येत आहेत, त्या सध्या अफवा सुरू आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील रोटेशननुसार आता शिवसेनेच्या उमेदवाराची वेळ आहे.” या विधानातून त्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काच्या जागेवर अप्रत्यक्षपणे दावा ठोकला आहे. हे ही वाचा… माझा पक्ष, माझा बाप अन् आता भाऊही पळवला:राज-एकनाथ भेटीनंतर अनेकांना पोटशूळ उठले; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच, शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. “या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे,” अशा शब्दांत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर