ब्रेकिंग न्यूज
⚡ Pandharpur: ‘5 मिनिटं थांबलो असतो तर माझाही जीव…’ विहीर दुर्घटनेतून कसा वाचला 16 वर्षांचा शुभम, सांगितला… ✦ ⚡ दिवाळीला मुलगी घरी आलेली, आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल, पण संशय बळावला अन् अनर्थ टळला, नाशिकात खळबळ ✦ ⚡ पारंपरिक शेतीची वाट सोडली, बोर लागवडीचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला निव्वळ 6 लाख नफा, Video ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार…
SP News Maregaon

नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांत फायरिंग:संघ मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली घटना, पोलिसांत खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महाल येथील कोठी रोड परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन वेगवेगळ्या दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दोन राऊंड गोळीबार केला. शहर शांततेत झोपलेले असताना अचानक झालेल्या या गोळीबारामुळे महाल आणि कोठी रोड परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास घडली. जुन्या वादातून आणि परिसरात स्वतःचे वर्चस्व तसेच दहशत प्रस्थापित करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी सौरभ नावाच्या तरुणाने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित आरोपी रवी मोहतो आणि गंगा काकडे यांनी हे फायरिंग केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री आणि बाळगल्याप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंतर्गत टोळीयुद्ध किंवा अमली पदार्थांच्या व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातूनच हा थरार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत ६ आरोपींना ताब्यात घेतले असून फरार संशयितांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून कोतवाली पोलीस या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर