ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा मृत्यू तर दोघे जखमी, चालकावर गुन्हा दाखल

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक लेलंड कंपनीचा १६ चाकी सिमेंट मिक्सर (एमएच 12 आरएन 2866) कात्रजकडून बावधनच्या दिशेने जात होता. चालक गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५०) हा वाहन अतिशय निष्काळजीपणे आणि अतिवेगाने चालवत होता. नवले चौकातून वळण घेत असताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अवजड मिक्सर रस्त्यावरच पलटी झाला. यावेळी मिक्सरच्या डाव्या बाजूने बावधनच्या दिशेने जाणारी होंडा शाईन दुचाकी (एम एच 23 बी एल 5225) या पलटी झालेल्या मिक्सरखाली पूर्णपणे चिरडली गेली. दुचाकीस्वार रामेश्वर मच्छिंद्र भोगले (वय ३१, रा. वाघजाई नगर, कात्रज; मूळगाव सांगवी, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सिमेंट मिक्सर चालक गोरख रनसुरे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोठ्या क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली आणि मध्यरात्री खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. मृत रामेश्वर भोगले यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून, जखमी चालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांनी सांगितले की, निष्काळजीपणे आणि अतिवेगाने वाहन चालवून मृत्यू व मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येत आहे. आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. नवले पुलावरील अवजड वाहनांच्या वेगावर पोलिसांनी कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना:कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीने दोन कामगारांचा मृत्यू, 3 कामगार गंभीर जखमी मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथे असलेल्या शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची धक्कादायक घटना घडली असून, या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासाअंती कंपनीमध्ये स्फोट नव्हे, तर कार्बन डायऑक्साइड गॅस गळती झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर