ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

देशातील 56 न्यायाधीश लंडनमध्ये सरकारी खर्चाने बॅटमिंटन खेळतायत:काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांनी पुन्हा एकत्र यावे- संजय राऊत

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत त्यांनी आपले पक्ष निर्माण केले आहेत त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येत काँग्रेसची ताकद वाढवण्याची गरज आहे. मग त्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांच्या गटात विलीन होण्यापेक्षा त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे असे मी म्हटलो होतो. हे मी तेव्हा बोललो होतो. आता तो विषय संपला आहे. तेलंगणा, ओडिशामध्ये अनेक घटक बाहेर पडत त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला यांनी काँग्रेसमध्ये यावे असे मत मी व्यक्त केले होते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, जे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांना राज्यात काँग्रेसच्या सहकार्यांची गरज आहे. मग तसे करण्यापेक्षा त्यांनी काँग्रेससोबत आले पाहिजे आणि देशासमोर एक मजबूत पर्याय दिला पाहिजे असे माझे मत होते. काँग्रेस आणि इतर घटक पक्षात यासंदर्भात चर्चा सुद्धा सुरू आहे. देशातील 56 न्यायाधीश हे लंडनमध्ये सरकारी खर्चाने बॅटमिंटन खेळत आहेत. किती दिवस झाले? खर्च कोण करतंय? तिथे पार्ट्या सुरू आहेत. याविषयी सर्वांनी बोलले पाहिजे. न्यायव्यवस्थेने राजकीय व्यवस्थेपासून अंतर ठेवले पाहिजे. बकवास न्यायव्यवस्था मोदी यांनी केली आहे.

कसला घंटा नारी सन्मान करता? संजय राऊत म्हणाले की, मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज अमित शहा यांच्या दबावाखाली फेटाळण्यात आला आहे. काँग्रेसची उमेदवार निवडून आणण्याइतकी ताकद तिथे होती. मुळात त्यांनी कोणताही एफआयआर लपवला नाही. झारखंडमध्ये एका भाजप पुरस्कृत उमेदवाराला तृटीसाठी 24 तासांचा वेळ दिला मग तोच न्याय नटराजन यांना का नाही. दोघांना एक नियम लागू होत नाही का? एका महिलेसाठी हा नियम लागू करत नाही. मग कसला घंटा नारी सन्मान करता. संपर्क होणे सामान्य गोष्ट! संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विनायक राऊत यांना संपर्क साधला म्हणून काय झाले. सभागृहात आमचे आणि भाजपचे लोकं एकत्रच बसलेले असतात. त्यामुळे संपर्क होतच असतो. त्यात काही वेगळे नाही. देशात कसली घंटा नारी सन्मान योजना आहे. काल मध्यप्रदेशमध्ये मीनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद केला हा काय नारी सन्मान झाला का? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी कोणताही गुन्हा लपवून ठेवला नाही. केवळ एक नोटीस होती FIR नाही तिचा उल्लेख नाही म्हणून उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. आमचा एकही खासदार कुठेही जाणार नाही! संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाचे कोणतेही खासदार कुठेही जात नाहीत. सर्व जण पक्षासोबत मजबुतीने उभे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीला अजून 3 वर्षे बाकी आहेत. सर्वच खासदारांचे आणि शिवसेना पक्षप्रमुखांचा संवाद सुरू आहे. हे लोकं म्हणतात तृणमूल काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. त्यांचे 20 खासदार फुटले जे फुटली त्यांचे नावे का समोर येत नाहीत? असा सवाल राऊत यांनी केला आहे. अमित शहा हे फुटले फुटले म्हणतात मग ते खासदार फुटतात. एखाद्याच्या मनात बेईमानीचा किडा गेला तर तो व्यक्ती पक्ष सोडतो. त्याला कारण आहे ते निवडणूक आयोग आणि देशाचे गृहमंत्री, ईडी, सीबीआय, न्यायालय. जो पर्यंत या संस्था पक्षासाठी काम करतील तो पर्यंत हे थांबणे शक्य नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर