ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

बनवाबनवी कांदा खरेदीची:‘नाफेड’च्या ठेक्यासाठी दाखवली ऑडिटमध्ये 1 कोटींची उलाढाल, बँक स्टेटमेंट देण्यास नकार, उपनिबंधक कार्यालयाचा शेरा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘नाफेड’चा कांदा खरेदीचा ठेका घेण्यासाठी काही सोसायट्यांनी कागदोपत्री वार्षिक एक कोटींची उलाढाल दाखवली असून, प्रत्यक्षात त्याबाबतचे खरेदी-विक्रीच्या आर्थिक उलाढालीचे बँक स्टेटमेंट सादर केले नसल्याची धक्कादायक बाब जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या अहवालातून समोर आली आहे. काम मिळालेल्या अनेक सोसायट्यांनी कागदावरच आर्थिक उलाढालीचे आभासी चित्र निर्माण केले असल्याचा शेरा निबंधक कार्यालयाने मारला आहे. कांदा खरेदी-विक्रीचे अनुभव प्रमाणपत्र न जोडणे, आयकर रिटर्न, जीएसटी नोंदी ही कागदपत्रे या संस्थांनी सादर केली नसताना नाफेडने या संस्थांना काम दिलेच कसे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून घोटाळ्यावर शिक्कामोर्तब होत आहे. नाफेडकडून जिल्ह्यात दोन लाख टन कांदा खरेदी सुरू असून त्यात कापडी पिशवी शिवण्याचा अनुभव असलेल्या संस्थेला कांदा खरेदीचा ठेका देणे, लेखापरीक्षकांनी स्वतः घेतलेले ठेके, सोसायटीच्या नावाखाली फार्मर प्रोड्युसर कंपन्या सर्व सूत्रे हलवत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ने समोर आणले. आता त्याहून मोठी धक्कादायक बाब म्हणजे काम मिळवलेल्या अनेक सोसायट्यांनी नाफेडकडून निविदा प्रक्रिया राबवताना टाकण्यात आलेल्या अटी-शर्तींचा भंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या सोसायट्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असून हा अहवाल नाफेडला सादर केला आहे. उपनिबंधकांच्या निर्णयानुसार ठेके रद्द करणार जिल्हा उपनिबंधकांना ठेका दिलेल्या संस्थांपैकी कोणती पात्र व कोणती अपात्र आहे, असा शेरा मारून अहवाल सादर करावा असे पत्र पाठवले आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेचे काम रद्द करायचे याचा निर्णय घेतला जाईल. -अंकित मदाम, शाखा व्यवस्थापक, नाफेड, नाशिक. या संस्थांबाबत गंभीर नोंदी
1. पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था
कांदा खरेदी-विक्रीबाबत बँक स्टेटमेंट जोडले नाही. 2. गोदावरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था
कांदा खरेदी-विक्रीबाबत बँक स्टेटमेंट जोडले नाही. 3. राजूर कृषी बहुउद्देशीय सेवा संस्था
कांदा खरेदी-विक्री व्यवहाराचे बँक स्टेटमेंट जोडले नाही. 4. चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था
कांदा खरेदी-विक्रीबाबत बँक स्टेटमेंट जोडले नाही. 5. शेतकरी सहकारी संघ, कळवण
सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल अप्राप्त. आभासी नोंदींचा शेरा 1. नांदगाव तालुका तुळजाभवानी शेतकरी विकास सहकारी संस्था
शिल्लक माल ताळेबंदात दाखवून खेळत्या भागभांडवलात वाढ केली.
रोखीने व्यवहार केल्याचे दाखवले.
बँक स्टेटमेंट जोडले नाही.
आयकर रिटर्न, टीडीएस, जीएसटीबाबत आर्थिक नोंदी पत्रकात नाहीत.
खरेदी-विक्रीचे मूळ दप्तर नाही. 2. श्री गुरुजी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था
रोखीने कांदा खरेदी-विक्री केल्याचे व्यवहार दिसून येतात.
व्यवहाराचे बँक स्टेटमेंट नाही.
आयकर रिटर्न, टीडीएस, जीएसटीबाबत नोंदी प्राप्त नाहीत.
माल शिल्लक अन‌् भांडवल खेळते.
खरेदी-विक्रीचे मूळ दप्तर नाही. 3. स्त्री शक्ती महिला अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था
आभासी नोंदी असून रोखीने व्यवहार नोंदवल्याचे दिसून येते.
कांदा खरेदी-विक्रीची नोंद व्यापारी पत्रकात दिसून येत नाही.
आयकर रिटर्न, टीडीएस, जीएसटीबाबत आर्थिक नोंद उपलब्ध नाही.
कांदा खरेदी-विक्रीबाबत बँक स्टेटमेंट जोडले नाही.
आर्थिक पत्रकात आभासी नोंदी दिसून येत आहेत. 4. वैष्णवी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था
प्रत्यक्षात कांदा खरेदी केल्याचे दिसून येत नाही.
आर्थिक पत्रकात आभासी नोंदी दिसून येतात.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर