ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पुण्यात भोंदूबाबा ‘मामा’चे कारनामे:चांडोलीतल्या शिवदत्त आश्रमात महिलांचे लैंगिक शोषण; महाराज नवनाथ गवळीविरोधात गुन्हा, पीडितेने मांडली कैफियत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकच्या अशोक खरातचे लैंगिक शोषण प्रकरण सुरू असतानाच आता नेमका असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या शिवदत्त आश्रमात समोर आलाय. या प्रकरणी नवनाथ पंढरीनाथ गवळी उर्फ मामा या भोंदूबाबाविरोधात राजगुरू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालीय. त्यानंतर हा भोंदूबाबा फरार झाल्याचे समजते. पुण्यातल्या या भोंदूबाबाविरोधात तक्रार देऊनही पोलिस कारवाई करत नाहीत, असा आरोप पीडितेने एका व्हिडिओद्वारे केलाय. खरेच पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चा आता सुरू झालीय. नेमके प्रकरण काय? पुण्यातील खेड तालुक्यात चांडोलीमध्ये नवनाथ गवळी हा शिवदत्त आश्रम चालवतो. त्याला अनेकजण आदराने मामा म्हणतात. हा मामा आश्रमात आलेल्या महिलांशी अश्लील चाळे करतो. अनेकांकडे त्यांने शारीरिक संबंधांची मागणी केली. महिलांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे समोर आले आहे. महिलेने दाखवले धाडस भोंदूबाबाच्या या छळाविरोधात एका महिलेने धाडस दाखवत राजगुरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र, त्यावर कसलिही कारवाई होत नाही, अशी खंत पीडित महिलेने एका व्हिडिओद्वारे मांडली आहे. दरम्यान, भोंदू पंढरीनाथ गवळीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे समजते. पीडिता काय म्हणाली? पीडित महिलेने एका व्हिडिओतून आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, ‘नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदूबाबा. ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते. त्याने माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलिस कंप्लेन केली.’ अजून कारवाई नाही पीडिता पुढे म्हणाली की, ‘आम्ही पोलिसांत तक्रार दिली. मात्र, अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. मला असे वाटते, माझ्याबाबत जो प्रकार झाला. तोच प्रकार कोणत्याही महिलेबाबतीत होऊ नये. त्यामुळे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याचा आश्रम चांडोली येथे आहे. याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात. मात्र, याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही सुरूच आहेत.’ अशोक खरातची पुनरावृत्ती नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातने महिला भाविकांचे लैंगिक शोषण केले. त्याने विविध पूजा, विधी याचे निमित्त साधून महिलांशी शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर सरकारने हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधातही कारवाई करणे सुरू केले. मात्र, पुण्यातला हा बाबा भोंदूबाबा अजूनही फरार आहे. वसईतही भोंदूबाबा वसईतील एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. स्वतःला शंकर म्हणवून घेत “मी शंकर, तर तू माझी पार्वती आहेस” असे सांगत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. काय सांगतो कायदा? महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलनाविरोधात नरेंद्र दाभोळकर यांनी लढा दिला. त्यांनंतर सरकारने 2013 मध्ये अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधात कायदा केला. अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांना रोखणारा व 3 वर्षांपर्यंत 6 महिने ते 7 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद असलेला हा फौजदारी कायदा आहे. त्यानुसार नरबळी, जादूटोणा, अघोरी उपचार, अंगात भूत संचारल्याचा दावा करून मारहाण करणे यांसारख्या प्रथांवर कायद्याने बंदी घातली गेली. मात्र, प्रभावी अंमलबजावणीचा अभाव आणि लोकांची श्रद्धा यांच्यापुढे हे कायदे सुद्धा थिटे पडल्याचे जाणवते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर