ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

आरोग्यमंत्र्यांच्या ‘संवाद यात्रे’पूर्वी यंत्रणा झाली सतर्क:जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाची अचानक करण्यात आली तपासणी‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या आगामी आरोग्य संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी बुधवारी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी केली. आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. अकोला येथील शासकीय रुग्णालयात नुकतीच एक खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेत एका गरीब महिलेला आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन संपूर्ण रुग्णालयात फिरावे लागले होते. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यात जिल्ह्यात कुठेही त्रुटी राहू नये. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तालुका पातळीवरील रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, मूर्तिजापूरचे हे उपजिल्हा रुग्णालय ऐतिहासिक वारसा असलेले आहे. या दौऱ्यात डॉ. कुलवाल यांच्यासोबत डॉ. रोकडे, डॉ. कोगदे, डॉ. विशाल येदवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, डॉ. विद्या भरणे, डॉ. जुनेद, डॉ. रेहान चाऊस, डॉ. दीपाली वडतकर, डॉ. कारोडे, डॉ. प्रधान, डॉ. चारथळ आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तपासणीदरम्यान डॉ. आरती कुलवाल यांनी रुग्णालयातील वॉर्ड, औषध साठा, आपत्कालीन विभाग आणि स्वच्छता गृहांची पाहणी केली. “शासकीय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मायेची आणि आपुलकीची वागणूक मिळणे हा त्यांचा हक्क आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागले पाहिजे, अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गरज भासल्यास कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे संकेतही त्यांनी दिले. रुग्णसेवेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : डॉ. आरती कुलवाल यांचा इशारा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर