ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

परवानगी नाही दिली तरी आंदोलन होणारच!:कर्जमाफीसाठीच्या जाचक अटीशर्ती रद्द केल्याशिवाय माघार नाही, रोहित पवार आक्रमक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंढरपुरात होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. पंढरपुरातील अन्नदात्याग आंदोलन अवघ्या ३६ तासांवर आले असताना प्रशासनाने वाहतुकीचा प्रश्न पुढे करत परवानगी नाकारली, असा दावा त्यांनी केला. रोहित पवार म्हणाले की, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने होणार असून वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून नामदेव पायरीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका कोपऱ्यात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “या आंदोलनस्थळी कोणतीही वाहनांची गर्दी होणार नाही. हे अन्नत्याग आंदोलन आहे, त्यामुळे कायदा-सुव्यवस्था किंवा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी, शेतीमालाच्या दरांच्या प्रश्नांवरून संतप्त आहेत. राज्यातील विविध भागांत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यापूर्वीही पंढरपुरात वारकरी आणि शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले आहे. रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत म्हटले, “प्रशासनाने आमची अडवणूक करण्यापेक्षा शेतकऱ्यांमधील संताप सरकारपर्यंत पोहोचवावा.” त्यांनी पुढे इशारा दिला की, “परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी आंदोलन होणारच. कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.” रोहित पवारांची ट्विटर एक्सवरील पोस्ट.. ‘कॉकरोच जनता पार्टी’चा आज पुण्यात एल्गार:दिल्लीतील आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर