ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मान्सूनचा ‘पॅटर्न’:एल निनो अन मान्सून बदलामुळे विदर्भ, नाशिक-संभाजीनगर विभाग संकटात! रब्बी हंगामाला फटका

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2025) बदलत आहे. 5 वर्षांत जून महिन्यात पावसाचे दिवस कमी-अधिक ( 7 ते 22) होत आहेत. त्यातच ‘कमी दिवसांत अतिवृष्टी’ म्हणजे ‘इंटेन्स स्पेल’ होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र सरकारचा ‘महावेध’ प्रकल्प स्कायमेटच्या सहकार्याने 2,335 स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे अचूक हवामान माहिती पुरवतो. या प्रकल्पाच्या ‘महारेन’ प्रणालीतून प्राप्त अधिकृत आकडेवारीचे विश्लेषण केले असता, राज्याची पावसाची सरासरी जरी कागदावर 99 टक्क्यांच्या आसपास दिसत असली, तरी प्रादेशिक पातळीवर भीषण असमतोल निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बंपर पावसामुळे राज्याची एकूण सरासरी भरून निघाली. इतर विभागात अपेक्षित पाऊस बरसला नाही. यंदा सलग तिसऱ्या वर्षी छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा), नाशिक विभाग (उत्तर महाराष्ट्र) आणि विदर्भ संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. पावसाचे दिवस घटल्याचा शेतीवर परिणाम हवामान विभागातील वैज्ञानिक एस. डी. सानप म्हणाले की, जूनमध्ये 10 ते 11 दिवसांतच महिन्याचा 80% पाऊस पडतो, तेव्हा शेतात पाणी साचून पेरणी कुजते किंवा वाहून जाते. उर्वरित महिना कोरडा गेल्याने पिके करपतात आणि दुबार पेरणीची वेळ येते. ‘इंटेन्स स्पेल’मुळे पाणी वेगाने वाहून जाताना सुपीक मातीचा वरचा थर वाहून नेतो. त्याने जमिनीची सुपीकता घटते. कमी दिवसांत जास्त पावसाने विहिरी कोरड्याच राहतात. त्याचा फटका रब्बी हंगामाला बसतो. एल निनोचा परिणाम नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातील डॉ. प्रवीणकुमार यांनी सांगितले की, 2023 मध्ये अत्यंत तीव्र एल निनोमुळे ऑगस्टमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 7 दिवस पाऊस पडला (54.3 मिमी, 28.1%). 2018मध्ये मध्य एल निनोमुळे जूनमध्ये 25, जुलै 26, ऑगस्ट 23 आणि सप्टेंबरमध्ये 8 दिवस पाऊस पडला. 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा लागला. 2015 मध्ये गेल्या 140 वर्षांतील हा सर्वात तीव्र एल निनो होता. ज्यामुळे मान्सूनमध्ये 30% ते 40% घट झाली. लातूरचे मांजरा धरण कोरडेठाक झाले. लातूरला विशेष वॉटर ट्रेनने पाणी पुरवावे लागले होते. 2009 हे तीव्र एल निनोचे वर्ष होते. जुलै व ऑगस्ट महिन्यांत पावसाने संपूर्ण दांडी मारल्यामुळे खरीप पिके पूर्ण करपली होती. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता नाशिक | मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 14 जून रोजी तुरळक ठिकाणी वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस तसेच उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. 15 ते 19 जून तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. 25 जून ते 1 जुलै दरम्यान मान्सूनचे वारे वाहतील.पण पावसाची शक्यता धूसर आहे. विदर्भात 14 ते 17 जून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. सेवानिृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, सध्या मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तापलेला असेल. गेल्या 5 वर्षांतील जूनमधील पाऊस व त्याचा परिणाम असा वर्ष विभाग/जिल्हा पावसाचे दिवस पाऊस (%) सद्य:स्थिती आणि परिणाम 2025 संभाजीनगर 11 दिवस 80.2% पावसाचे दिवस घटले, कोसळण्याचा नाशिक 20 दिवस 104.7% वेग वाढला. पिकांचे नुकसान.
2024 संभाजीनगर 22 दिवस 136.9% अतिवृष्टीचे दिवस: जूनमध्ये मान्सूनची नाशिक 23 दिवस 114.5% धुवाधार आणि सर्वदूर हजेरी.
2023 संभाजीनगर 7 दिवस 49.0% मोठा खंड: जून महिना कोरडा, नाशिक 8 दिवस 41.4% उत्तर महाराष्ट्र-मराठवाड्यावर संकट
2022 संभाजीनगर 17 दिवस 102.3% पाऊस सरासरीच्या आसपास. कमी नाशिक 14 दिवस 79.4% दिवसांत जास्त कोसळला.
2021 संभाजीनगर 22 दिवस 149.6% सर्वसमावेशक सुरुवात: राज्यभर नाशिक 17 दिवस 90.4% विखुरलेला, पिकांना जीवदान

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर