ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अमरावतीतील रेंजवर एकाच वेळी 36 धनुर्धर भेदणार लक्ष्य:485 खेळाडू, संघ व्यवस्थापक, निवड समिती सदस्यांसह विभागाचे खेळाडू सहभागी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन १८ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या खेलो इंडिया आर्चरी आंतरराष्ट्रीय रेंजवर स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्चरी रेंजवर होणार असून येथे एकाचवेळी ३६ धनुर्धर लक्ष्याच्या दिशेने तीर सोडू शकतात, अशी सोय आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी धनुर्धरांसाठी सर्वच सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे सातत्याने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन होत असते. त्याचप्रमाणे राज्यातील ८ महसूल विभाग आणि १ क्रीडा प्रबोधिनी, पुणे अशा एकूण ९ विभागांतील १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे ४८५ खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. उद््घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित राहतील. जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार उद्घाटन समारंभात आर्चरी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदिप भोगे, मधुरा धामणगांवकर, पुर्वशा शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तुषार शेळकेने रिकर्व्ह प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सांघिक रौप्य पदक जिंकून दिले आहे. त्याचप्रमाणे मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदीप भोगे, मधुरा धामणगांवकर व पुर्वशा शेंडे यांनीही सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विश्वचषकात पदकांची कमाई केली आहे. झारखंड, मणिपूर येथील स्पर्धेसाठी संघ निवड निवड समिती निरीक्षण करून महाराष्ट्र राज्याच्या १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या संघाची निवड करतील. महाराष्ट्र राज्याचा संघ २० डिसेंबर रोजी सायंकाळी घोषित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडू झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे. सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर