ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

पेट्रोल-डिझेलच्या मागणीत 30% वाढ:काहीतरी गडबड असण्याची शक्यता; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली शंका, प्रशासनाला आदेश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तातडीच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात सरकार गंभीर असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल, तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षी किती इंधन लागते याचा अंदाज प्रशासनाला असतो, मात्र अचानक इतकी वाढ होत असेल तर त्यामागे काहीतरी गडबड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना इंधन मिळावे आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही जिल्ह्यांत वाहनांचे आरसी बुक तपासून डिझेल देण्याची पद्धत सुरू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसेच पुरवठा साखळीतील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. अचानक वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिर्डीमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू दरम्यान, शिर्डीमध्ये आज संरक्षण क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून शिर्डीची ओळख आता धार्मिक केंद्रासोबत संरक्षण उत्पादन क्षेत्रातही निर्माण होणार आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. मोदींच्या आवाहनाला फडणवीसांचा प्रतिसाद:वंदे भारतने केला शिर्डी प्रवास; संदेश देण्याचा प्रयत्न, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य महाराष्ट्रात डिझेलसाठी रात्रभर पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची गर्दी:विदर्भ-मराठवाड्यात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा; रोहित पवार यांचाही सरकारवर निशाणा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर