ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हिट अँड रन:हायवाची महाविद्यालयीन तरूणींच्या मोपेडला धडक; एक ठार, दोघी जखमी, चालक पसार, सातारा परिसरातील घटना

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हायवाने 3 मैत्रिणी जात असलेल्या मोपेडला धडक दिली. यात अंगावरून चाक गेल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 मैत्रिणी जखमी झाल्या. घटना घडूनही हायवाचालक घटनास्थळी थांबला नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत कुणीही चालक ठाण्यात आला नसल्याची माहिती आहे. हा प्रकार 13 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर हायवेवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ घडला. प्रतीक्षा बाळासाहेब सांगवे (21, रा. चाकूर, जि. लातूर) असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. कॉलेजचे प्रॅक्टिकल संपवून 5 वाजेच्या सुमारास गीतांजली, ऋतुजा व प्रतीक्षा या तिन्ही मैत्रिणी घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी धुळे-सोलापूर हायवेवर सर्व्हिस रोडच्या ठिकाणाहून सातारा गावाकडे येत होत्या. त्या वेळी पेट्रोल पंपाजवळ अज्ञात हायवाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात प्रतीक्षा रस्त्याच्या बाजूला पडल्याने तिच्या अंगावरून हायवाचे चाक गेले, तर अन्य दोघी बाजूला पडल्याने बचावल्या. अपघाताची माहिती मिळताच निरीक्षक निर्मला राख, नंदकुमार भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नोकरीच्या शोधात होती प्रतीक्षा प्रतीक्षाच्या वडिलांचा 6 वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते अंथरुणाला खिळले. त्यामुळे तीन बहिणी व एका लहान भावाच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईनेच पुढाकार घेतला. वडिलांचे चांगल्या रुग्णालयात उपचार व्हावे यासाठी कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षांत असतानाच ती पुण्यात इंटर्नशिप करत होती. लवकर चांगला पगार मिळवून वडिलांवर चांगल्या रुगणालयात उपचार करण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र नियतीपुढे सर्वच स्वप्ने आता अधुरी राहिली. कॉलेजच्या मेसेजने पहाटेच शहरात कॉलेजने उपस्थिती बंधनकारक केल्याचा मेसेज केला. त्यामुळे प्रतीक्षा रात्री पुण्याहून निघाली होती. पहाटेच ती शहरात दाखल झाली होती. टीव्ही सेंटर परिसरात मैत्रिणीच्या रूमवर राहून ती कॉलेजला गेली होती. तर कॉलेज संपल्यावर ती सिडको एन-5 परिसरातील नातेवाइकांकडे जाणार होती. महाविद्यालयातून परतताना अपघात; तरुणी चाकाखाली आल्याने चिरडली गेली मैत्रिणीचा मृतदेह बघून आली भोवळ कॉलेजमध्ये दिवसभर सोबत, त्यानंतर परतताना गप्पा मारल्या. एकाच गाडीवर एका मैत्रिणीला सोडण्यासाठी जात होत्या. त्यांना काही कळण्याच्या आतच त्यातील एक मैत्रिणी मृत्युमुखी पडली. मैत्रिणीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह बघून एका मैत्रिणीला जागीच भोवळ आल्याने तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर