ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

पुण्याच्या विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मदत द्या:डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याबाबत शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विषारी दारू दुर्घटनेतील पीडित कुटुंबांची बिकट परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची विनंती केली. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर त्यांनी स्वतः पीडित कुटुंबांची भेट घेऊन वैयक्तिक आर्थिक मदत केली होती. मात्र अनेक कुटुंबांतील कमावती व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याने महिलांवर, लहान मुलांवर तसेच वृद्ध सदस्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अनेक महिलांचे शिक्षण मर्यादित असल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला असून मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन उदरनिर्वाहाची चिंता वाढली आहे. या प्रकरणी अनेकांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असली तरी प्रत्यक्ष मदतीची प्रक्रिया अपेक्षित वेगाने झाली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना बोलून देखील अद्यापही काहीही झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी तातडीने गरजू कुटुंबांना मदत दिल्यास त्यांना हातभार लागेल अशी भावना डॉ गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर