ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

“शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक‎परिस्थितीशी जुळवून घ्यावे”‎:ज्ञानसंपदा विद्यालयात आयोजित कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ज्ञानसंपदा शाळेत शिक्षक प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. “सु-मन’ या कार्यशाळेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षण पद्धतीतील तर्कशुद्ध विचार मांडत, शैक्षणिक पार्श्वभूमी, बदलत्या शिक्षण पद्धतीत अध्यापन करताना बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे यावर भर दिला. स्वातंत्र्यपूर्व शिक्षण, तेव्हाची शिक्षणाची गरज, त्या काळात उभ्या राहिलेल्या समाजसुधारकांचे व शाळांचे योगदान यावर विस्तृत चर्चा केली. स्वातंत्र्यानंतर बदललेली शिक्षणाची गरज, सामाजिक परिस्थिती व सरकारी धोरणे याविषयी प्रसंगकथनाच्या माध्यमातून संवाद साधला. विद्यार्थ्यांना भावनिक स्तरावर समजून घेणे, त्यांच्यातील कौशल्ये ओळखणे व राष्ट्रभक्ती निर्माण करणे हे साचेबद्ध अध्यापनाने शक्य नाही. यासाठी वि‌द्यार्थ्यांना प्रयोगशील बनवणे अधिक आवश्यक आहे, यावर एकमत झाले. सध्याच्या अध्यापन करताना येणाऱ्या अडचणी सामाजिक समस्या व त्यानुसार सतत प्रयोगशील असण्याची गरज यावर अर्थपूर्ण संवाद साधला गेला. या कार्यशाळेत संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष मिलिंद गंधे, मानद सचिव अरुण कुलकर्णी, विश्वस्त श्रीहरी टिपूगडे, डॉ. सुनिता भागवत, मृणाल पोतनीस, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर