ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहण्याची गरज‎:नगरसेवक निखील वारे यांचे प्रतिपादन, विविध 100 प्रजातींच्या वृक्षांची भेट

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारा आदर्श उपक्रम म्हणून मनपा उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक निखिल वारे यांनी १०० वृक्षांची भेट देत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेला अधिक गती मिळणार असून शहरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभारण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी उद्योजक जनक अहुजा, उद्योजक आदेश चेंगडिया, राजेंद्र बलदोटा, अभिजीत बोरुडे, सुहास मुळे, स्वप्निल दगडे, मितेश शहा, विजय वडागळे, संदीप पवार आदी उपस्थित होते. नगरसेवक निखिल वारे म्हणाले, या मोहिमेसाठी दहा ते पंधरा फूट उंचीची विविध प्रजातींचे १०० वृक्ष भेट दिले. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वाढते तापमान, प्रदूषण आणि घटणारे हरित क्षेत्र यामुळे भविष्यात मानवासमोर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी आतापासूनच वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची व्यापक चळवळ उभी करणे आवश्यक आहे. अहिल्यानगर शहराला हरित सिटी बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. उपमहापौर जाधव म्हणाले, नगरसेवक निखिल वारे यांनी १०० वृक्षांची भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत सकारात्मक संदेश दिला आहे. आपले सण, उत्सव आणि वाढदिवस हे केवळ औपचारिक न राहता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरे झाले पाहिजेत. त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सामाजिक बांधिलकीची जाणीवही दृढ होते. आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेकजण पर्यावरण संवर्धनाबाबत पोस्ट आणि संदेश शेअर करतात; मात्र प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांची संख्या कमी आहे. काहीजण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून फोटोसेशन करतात पण त्यानंतर त्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. केवळ वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. उपस्थित मान्यवरांनी नगरसेवक निखिल वारे यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे तसेच उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांच्या ग्रीन सिटी मोहिमेचे कौतुक करत शहराच्या हरित भविष्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते. वृक्षांची काळजी घेणे महत्वाचे : जाधव काहीजण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून फोटोसेशन करतात पण त्यानंतर त्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. केवळ वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन करणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी यावेळी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर