ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पवार म्हणाले, चर्चा नको, मागणी मान्य करा‎:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोनवर दोनदा चर्चेचे आवाहन, आ. रोहित पवारांचा नकार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (शनिवार) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची गर्दी आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. आ. रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी किसान सभेचे अजित नवले, खा. निलेश लंके, खा. भास्कर भगरे, आ. राजू खरे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आले होते. आंदोलन थांबवण्यासाठी कृषीमंत्री भरणे यांनी दोनवेळा फोन करून आंदोलन स्थगित करा, मुंबईला चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. मात्र आ. पवार यांनी चर्चा करण्याची आवश्यकता नाही, शासनाने मागण्या मान्य केल्याचे जाहीर करावे, आंदोलन मागे घेऊ, असे सांगितले. उद्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.प्रणिती शिंदे आंदोलनास भेट देऊन पाठिंबा देणार आहेत. रविवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शटगार येणार. आज अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील येणार आहेत. रविवारी दुपारी एक वाजता येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीने आज गर्दी वाढण्याची शक्यता आहे. आंदोलनस्थळी दिवसातून ३ वेळा भजन, हरिपाठ आयोजित करण्यात येत आहे.शिवराज वाकोडे यांची तब्येत खालावली. उपचारासाठी न्यावे लागले. आ. रोहित पवार हे केवळ माध्यम आहेत, राज्य शासनाने लक्षात घ्यावे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ही भावना आहे. सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा दोन दिवसानंतर शेतकरी मंत्र्यांना राज्यभरात फिरू देणार नाहीत, सर्वत्र आंदोलन सुरू होईल. खा. निलेश लंके यांचा इशारा आंदोलनस्थळी भजनाचा सूर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर