ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

श्री रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग दर्जाची मागणी:2.50 कोटी मंजूर, तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेंतर्गत 2.50 कोटीतून 90% कामे पूर्ण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील दहीहंडा येथील श्री संत रूपनाथ महाराज संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आ. रणधीर सावरकर यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव आवश्यक दस्तऐवजांसह ग्रामविकास विभागाच्या सहसचिवांकडे सादर करण्यात आला आहे. श्री रूपनाथ महाराज संस्थान हे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील लाखो भाविक भक्तांचे मोठे श्रद्धास्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येथे वर्षभर भाविकांची मोठी मांदियाळी असते. या पार्श्वभूमीवर, येथे येणाऱ्या भक्तांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे अत्यंत आवश्यक असल्याने या संस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. भाविकांसाठी सुविधांची उभारणी : आ. रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांतून तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेंतर्गत या संस्थानच्या विकासासाठी शासनाकडून २.५० कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर झाला आहे. या निधीतून भाविकांसाठी विविध मूलभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू असून, सद्यःस्थितीत सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर