ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाईच्या पायथ्याशी भ्रष्टाचाराचे “शिखर’:बारी ग्रा.पं.त दुसऱ्या गावांचे फोटो टाकून लाखो रुपये लाटल्याचा आरोप‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोले महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासूनचे सर्वोच्च ठिकाण असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील ‘कळसूबाई शिखर’ ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते, त्याच आदिवासीबहुल आणि दुर्गम बारी ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत हा घोटाळा झाला असून, देवेंद्र काशिनाथ खाडे व स्थानिक ग्रामस्थांनी याविरोधात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी केली आहे. दुर्गम बारी येथील तरुण आणि आरटीआय कार्यकर्ते देवेंद्र खाडे, गोरख खाडे, किसन खाडे, राधाकृष्ण खाडे व सागर खाडे यांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभाराची अधिकृत माहिती मागवली होती. मात्र, दोन महिने उलटूनही ग्रामपंचायतीने माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. माहिती दडपण्याच्या या प्रकारामुळे ग्रामपंचायतीचा कथित गैरव्यवहार अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांनी पुराव्यांसह केलेल्या दाव्यानुसार, सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी कोणतीही ग्रामसभा न घेताच थेट संगनमत करून बोगस कारभार केला. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या गावातील विकासकामांचे फोटो ऑनलाइन अपलोड करून शासकीय निधी लाटल्याचा गंभीर आरोप आहे. शासनाने अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी पाठवलेला लाखो रुपयांचा निधी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने कामाचे स्वरूप गावात प्रत्यक्षात पाणीच नाही, तरीही दुरुस्तीची बिले काढली. जमिनीवर अशी कोणतीही कामे झालेली नाहीत. जि.प. शाळा (१.४० लाख), संगणक (१.२४ लाख) खोटी बिले. दुर्गम भागातील तरुणांसाठी कागदावरच जिम उभी राहिली. येथेही संशयास्पद खर्च दाखवण्यात आला. पाणीपुरवठा योजना दुरुस्ती सोलर पंप खरेदी शाळा व संगणक खरेदी जिम साहित्य स्मशानभूमी ₹ ५ लाख ६० हजार ₹ ४ लाख ८० हजार ₹ २ लाख ६४ हजार ₹ १ लाख २० हजार ₹ तीन हजार अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर चौकशी ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराविरोधात १० मार्च २०२६ व ६ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती अकोले, आणि ४ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे रीतसर तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, यावर तपास करणारे विस्तार अधिकारी अटकोरे व सहायक गटविकास अधिकारी मुठे यांनी थातूरमातूर चौकशी करून हे गंभीर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे. लुटला गेल्यामुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी आनंद भंडारी आणि अकोलेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बारी ग्रामपंचायतीची बँक खाती तत्काळ ‘सील’ करावीत आणि दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवावे, अशी मागणी देवेंद्र खाडे यांच्यासह बारीच्या ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या आरोपांबाबत बारीचे उपसरपंच गणेश खाडे यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर