ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

ठाकरे बंधुंच्या पत्रकार परिषदेत काय घडले?:पत्रकारांचे प्रश्न आणि राज-उद्धव यांची विरोधकांवर टोलेबाजी, वाचा प्रश्नोत्तरे जशास तशी…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असेल,” अशा शब्दांत ठाकरे बंधूंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ऐतिहासिक युती आज अधिकृतरित्या जाहीर करत, आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आज झालेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे देत, भाजपसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही सूचक टोले लगावले. या पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरे वाचा जशास तशी… पत्रकार: उद्धव सर, ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं स्थानिक पातळीवरती… उद्धव ठाकरे: अजून बाकीच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा, कालपर्यंत युती झालेली नसेल, नाशिकमध्ये झालेली आहे. बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा तिथल्या युतीवर आज उद्या शिक्कामोर्तब होईल. पत्रकार: सर मराठवाडामध्ये काय असणार आहे? रावसाहेब दानवे असं म्हणतात की ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, या इलेक्शननंतर त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत… उद्धव ठाकरे: त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोणी विचारत नाही. पत्रकार: उद्धवजी, उद्धवजी… राज ठाकरे: मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही. पत्रकार: उद्धवजी मराठवाडामध्ये, उद्धवजी उद्धवजी सर… राज ठाकरे: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच. पत्रकार: पण भाजप म्हणतेय की यामुळे मुस्लिम मतांचे राजकारण… राज ठाकरे: मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ‘अल्ला हू अकबर’ असं बोललेले आहेत ते, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ना… पत्रकार: लावणार का? पुन्हा व्हिडिओ लावणार का? व्हिडिओ पुन्हा लावणार का? राज ठाकरे: ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार आहेत. पत्रकार: उद्धवजी, ‘बटेंगे तो कटेंगे’ उत्तर भारतीयांसाठी, यावर काय म्हणाल? राज ठाकरे: काय म्हणायचं? सगळ्यावर कसं बोलायचं? पत्रकार: उद्धवजी महाविकास आघाडीच काय? महाविकास आघाडीबाबत काय? राज ठाकरे: मला असं वाटतं आज मुंबईचं आम्ही तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जश्या जश्या होतील तश्या तुम्हाला सांगू. पत्रकार: साहेब मुंबईच्या युतीत राष्ट्रवादी पवार साहेब आहेत का? पक्ष सोडून गेलेल्यांना परत प्रवेश देणार का? मनसे किंवा शिवसेनेमधून जे पदाधिकारी कार्यकर्ते बाहेर गेलेत त्यांना आता युती झाल्यानंतर परत… राज ठाकरे: येऊ तर देत पहिलं. पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? हा एकनाथ शिंदे… उद्धवजी पवार साहेबांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का मुंबई किंवा इतर… राज ठाकरे: उद्धववरती खूप असतं सगळं. पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? उद्धवजी ठाकरे बंधूंची युती होत असताना महाविकास आघाडी विस्कटलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढतेय आणि जे भाजपला हवंय तेच होताना दिसतंय, कारण परप्रांतीय आणि मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून… उद्धव ठाकरे: भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्याशी पण चर्चा चालू आहे. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पत्रकार: या युतीमध्ये आणखीन कुठला एखादा पक्ष येणार आहे का? उद्धव ठाकरे: जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्याच्यात भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे, त्याच्यात काही जण भाजपात सुद्धा आहेत ज्यांना हे जे काही चाललंय ते पाहावत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. पत्रकार: उद्धवजी तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात का? उद्धव ठाकरे: काँग्रेसने तर जाहीर केलं ना? मग आता आणखीन काय बोलायचं? जोडलं का तोडलं? पत्रकार: पण उद्धवजी त्यांनी बाहेर पडण्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्यामुळे त्यांचे विचार… उद्धव ठाकरे: बघा मला बाकी कोण काय म्हणतय त्याच्याशी काही कर्तव्य नाही, मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघू. पत्रकार: तुमचं जागा वाटप… महाविकास आघाडी अबाधित आहे का अजून सुद्धा? उद्धव ठाकरे: सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे. पत्रकार: उद्धवजी, २०१८ साली याच जिमखान्यात एक जागा वाटप झालं होतं… युतीची घोषणा करताना ५०-५० जागा वाटपाचं समीकरण ठरलं होतं. तर आज ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना महानगरपालिकेत सत्ता आली, तर सत्ता वाटपाचं काही सूत्र आहे का? उद्धव ठाकरे: त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहितीये, तर आता आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचं घर आहे ना, दार बंद कशाला करता? पत्रकार: जागा वाटप केव्हा जाहीर होईल? उद्धव ठाकरे: निवडणुकीपूर्वी. अरे झालेलं आहे जागा वाटप. निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचा मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर