ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,” असे राऊत यांनी सांगितले. गीतेंना मिळालेले मतदान लोकांच्या रोषाचा परिणाम
यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमध्ये उमेदवारी मागे घेतल्यानंतरही गोकुळ गीते यांना मिळालेले मतदान हा लोकांच्या रोषाचा परिणाम आहे. शिंदे गटाचे आणि भाजपाचे मतदार ठाण्यात ठेवले होते, मात्र त्यांनी मतदानाच्या दिवशी शिंदे गटाच्या विरोधातील उमेदवाराला मतदान केले,” असा दावा राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू खोटे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हसू खोटे आहे. दिल्लीतून शिंदेंना बळ दिले जात असून फडणवीस यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला. शिंदे गटाचा उमेदवार भाजपानेच पाडला
राऊत पुढे म्हणाले, शिंदे गटाचा उमेदवार भाजपानेच पाडला. गोकुळ गीते यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र लोकांनी त्याला उत्तर दिले. खासदार-आमदार फोडता येतील, पण आमची जिद्द आणि विचार संपवता येणार नाहीत, असे म्हणत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पुढील राजकीय निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षविरोधी कारवायांमुळे कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्षविरोधी कारवायांबाबत कठोर भूमिका घेत कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर माहिती देत, “कृष्णा नागेश पाटील (आष्टीकर) यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे,” असे म्हटले आहे. राऊतांच्या दाव्यावर महाजनांचा पलटवार संजय राऊत यांच्या दाव्याबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी तो फेटाळून लावला. “संजय राऊत जे बोलत आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्ट शब्दांत महाजन यांनी सांगितले. हे ही वाचा.. नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर