ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वाढत्या उन्हात शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी कसरत:बागायत क्षेत्रात केलेल्या कपाशीच्या लागवडी उष्णतेने उगवणीपूर्वी जळू लागल्या‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा पुरता चिंतेत सापडला आहे. जमिनीत उष्णता असल्याने अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असल्याने कपाशीची आगाऊ लागवड केली, त्यांच्यावर आता दिवसाआड पाणी देण्याची वेळ आली आहे. मात्र, उष्णता इतकी तीव्र आहे, पाणी देऊनही कपाशी उगवण्यापूर्वीच होरपळून जळत असल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. मशागती आटोपल्या, पण कृषी विभागाचा ‘वेट अँड वॉच’चा सल्ला तालुक्यात खरिपाच्या शेतीची मशागत होऊन तब्बल दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृषी विभागानेही शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या किंवा लागवडी करण्याची घाई करू नये. या आवाहनामुळे बहुतांश शेतकरी आता मान्सून सक्रिय होण्याची वाट पाहत आहेत. यंदा ‘एल निनो’च्या प्रभावाची चर्चा सुरू झाल्यापासून शेतकरी अत्यंत जपून पावले टाकत असल्याचे चित्र बाजारात आणि शिवारात दिसत आहे. सध्यातरी शेतकरी नवी लागवड करण्याऐवजी केवळ उभी पिके जगवण्याच्या प्रयत्नात आहेत. तालुक्यातील पाणी टंचाईचे चित्र दोन वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळत आहे. मुळा नदीकाठ (बागायत पट्टा) बंधारे गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे कोरडे आहेत. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. पिके जगवणे कठीण झाले आहे. प्रवरा नदीकाठ नदीत पाणी सोडल्यामुळे बंधारे भरलेले आहेत. या भागातील पाण्याची अडचण तूर्तास सुटली आहे, मात्र उन्हामुळे पिके वाचवण्यासाठी कसरत सुरूच आहे. राहुरी तालुक्यात प्रामुख्याने कपाशी, उसासह चाऱ्यासाठी मका आणि घास या पिकांची लागवड केली जाते. यंदा मात्र वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे विजेची मागणी वाढली आहे. तालुक्यात विजेचा मोठा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना अधिकृतपणे केवळ ६ तास वीजपुरवठा केला जात आहे. भारनियमन (लोडशेडिंग) करण्यासाठी अनेक ठिकाणी महावितरणकडून आलटून-पालटून अख्खा दिवस ट्रान्सफॉर्मर बंद ठेवले जात आहेत. एकीकडे दिवसाआड पाणी न दिल्यास कपाशी जळून खाक होत आहे, तर दुसरीकडे विजेच्या लपंडावामुळे पाणी कसे द्यावे, या विवंचनेत शेतकरी पुरता होरपळून निघाला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे तालुक्यात विजेचीही प्रचंड मागणी वाढली

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर