ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

105 गावांत कायदा-सुव्यवस्था सक्षम करू:मारेगाव पोलिस ठाण्यात प्रशासकीय खांदेपालट‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याच्या उद्देशाने पोलिस प्रशासनात एक महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या बदलीनंतर, तरुण आणि अभ्यासू अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर दानडे यांच्याकडे मारेगाव पोलिस ठाण्याचा नवा कार्यभार अधिकृतपणे सोपवण्यात आला आहे. या नव्या नियुक्तीमुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेला नवीन गती मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मारेगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मुख्य शहरासह तब्बल १०५ गावांचा विस्तीर्ण ग्रामीण भाग येतो. एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता, प्रत्येक गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोलिसांचा धाक आणि सुरक्षिततेचा विश्वास पोहोचवणे हे नव्या प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. सागर दानडे यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागात पोलिस यंत्रणेची उपस्थिती अधिक मजबूत होईल. पोलिसांचा नागरिकांशी असणारा संवाद अधिक सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.गेल्या काही काळापासून तालुक्यात जुगार, मटका, अवैध दारू विक्री यांसारख्या समाजकंटक प्रवृत्तींमुळे नागरिक त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर, नव्याने पदभार स्वीकारलेले अधिकारी या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक अंकुश ठेवून, कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा मानस नवीन नेतृत्वाकडून व्यक्त होत आहे. कोणत्याही भागात शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस, जनता यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असतो.मारेगाव तालुक्याचा मोठा विस्तार लक्षात घेता, ग्रामीण भागात नियमित गस्त वाढवणे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी अवैध अड्ड्यांवर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे.महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना नागरिकांतील भीती दूर होईल मारेगाव तालुक्याला लाभलेल्या या नवीन आणि तरुण नेतृत्वाकडून तालुक्याचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी आशा नागरिकांना आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये अवैध धंदे, दारू भट्टयावर कारवाई होईल, अशी नागरिकांना अपेक्षा आहे. नव्या ठाणेदारांच्या धडक आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे मारेगाव तालुका लवकरच गुन्हेमुक्त आणि भयमुक्त होईल, असा विश्वास सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर