ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

हैदराबादवरून कट्टा आणणाऱ्या तडीपार आरोपीला उमरखेड येथून केली अटक:डीबी पथकाची धडक कारवाई, कट्टा पुरवणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातून तडीपार असलेल्या एका आरोपीला हैद्राबाद येथून देशीकट्टा शहरात आणताना ५ किमी अंतरावरील मार्लेगाव फाटा येथे देशीकट्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवार दि. १० जून रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान उमरखेड पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने केली. अरिशोद्दीन मोहम्मद तारेकोद्दीन खतीब (वय २४) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अरिशोद्दीन मोहम्मद तारेकोद्दीन खतीब हा उमरखेड पोलिस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आला होता. मात्र तो हैदराबाद येथून पुन्हा उमरखेड येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच त्याच्याकडे देशी कट्टा असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने सापळा रचून आरोपीचा शोध घेतला. कारवाईदरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३० हजार रुपये किमतीचा देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीकडे शस्त्र कुठून आले आणि त्याचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता, याबाबत चौकशी सुरू आहे.तसेच त्याच्याकडे देशी कट्टा असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना प्राप्त झाली होती. ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि व्यंकट गंगलवाड, पोउपनि शरद लोहकरे, चंदन जाधव, दिगांबर गीते, संघशील टेंबरे यांच्यासह उमरखेड पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाने सहभाग घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर