ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

3,039 केंद्रांचे कामकाज झाले ऑनलाइन:पोषण ट्रॅकरवरच नोंदी; सेविकांना दिलासा, अंगणवाड्यांतील ११ रजिस्टर इतिहासजमा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामीण भागातील अंगणवाड्यांचे कामकाज आता डिजिटल युगात प्रवेश करीत असून, जिल्ह्यातील ३,०३९ अंगणवाड्यांमध्ये पारंपरिक रजिस्टर पद्धतीला मोठ्या प्रमाणात फाटा देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार बहुतेक सर्व नोंदी आता ‘पोषण ट्रॅकर’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांवरील कागदी कामाचा ताण कमी होऊन लाभार्थ्यांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत बालकांची उपस्थिती, वजन-उंची नोंदी, कुपोषण स्थिती, गर्भवती व स्तनदा मातांची माहिती, पोषण आहार वितरण यासह विविध बाबींसाठी ११ स्वतंत्र रजिस्टर ठेवावे लागत होते. या नोंदींसाठी सेविकांचा मोठा वेळ खर्ची पडत होता. मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयामुळे बहुतांश माहिती थेट डिजिटल प्रणालीत नोंदवण्यात येणार आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार, केवळ लेखापरीक्षणासाठी आवश्यक असलेले आहार रजिस्टर, साहित्य साठा नोंदवही आणि लसीकरणाशी संबंधित काही नोंदी भौतिक स्वरूपात ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित सर्व माहिती पोषण ट्रॅकर अॅपवर अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २०१८ पासून अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र ऑनलाइन नोंदींसोबतच कागदी रजिस्टरही ठेवावे लागत असल्याने दुहेरी कामकाजाचा बोजा वाढला होता. आता शासनाने रजिस्टर पद्धतीत कपात केल्याने सेविकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार असून, कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, डिजिटल नोंदीमुळे लाभार्थ्यांची माहिती तात्काळ उपलब्ध होणार असून, बालकांचे आरोग्य, पोषणस्थिती आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सेविकांना दुहेरी नोंदीतून अखेर दिलासा अंगणवाडी सेविकांना गेल्या काही वर्षांपासून मोबाइल अॅपवर माहिती भरल्यानंतरही त्याच माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागत होती. त्यामुळे वेळ आणि श्रमांचा मोठा अपव्यय होत होता. शासनाने आता बहुतांश रजिस्टर बंद करून डिजिटल नोंदींना प्राधान्य दिल्याने सेविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि गती वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर