ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

रोहित पवारांचं उपोषण म्हणजे ‘जरांगे स्टाईल नौटंकी:भाजप आमदार परिणय फुकेंची टीका, म्हणाले- ‘अन्नत्याग’ऐवजी ‘मीडिया त्याग’ करावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांचा वाढता पाठिंबा मिळत असला तरी, सत्ताधारी नेत्यांकडून मात्र यावर जोरदार टीका केली जात आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यापाठोपाठ आता भाजप आमदार परिणय फुके यांनीही रोहित पवारांच्या या उपोषणावर सडकून टीका केली असून, हे आंदोलन म्हणजे निव्वळ ‘जरांगे पाटील स्टाईल नौटंकी’ असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेले ‘अन्नत्याग आंदोलन’ ही निव्वळ ‘मनोज जरांगे पाटील स्टाईल नौटंकी’ असल्याची खोचक टीका भाजपचे विधानपरिषद आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. एकीकडे सत्ताधारी नेत्यांकडून या उपोषणाची खिल्ली उडवली जात असतानाच, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवारांच्या या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे, ही बाब या राजकीय घडामोडींमध्ये विशेष लक्षवेधी ठरत आहे. काय म्हणाले परिणय फुके? रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका करताना परिणय फुके म्हणाले, रोहित पवार जे उपोषणाला बसले आहेत, ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठी किंवा त्यांच्या कोणत्याही खऱ्या प्रश्नांसाठी नाही. त्यांनी जे ‘अन्नत्याग आंदोलन’ सुरू केले आहे, त्याऐवजी त्यांनी आता ‘मीडिया त्याग आंदोलन’ करायला हवे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या बैठकीवर निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची तातडीची बैठक बोलावली असून, यावरून भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ज्याप्रमाणे पूर्वी आमदारांनी उठाव केला, तसाच उठाव आता खासदारही करतील या भीतीपोटीच उद्धव ठाकरे आपल्या खासदारांची मोजदाद आणि चाचपणी करत आहेत, असे फुके यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर