ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

शिक्षकाचे चिमुकल्यांशी अश्लील चाळे:संतप्त पालकांनी भरचौकात कपडे फाडून केली चपलेने मारहाण; भंडारा जिल्ह्यातील घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गुरू – शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. वडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका नराधम शिक्षकाने निरागस चिमुकल्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विकृत प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला भरचौकात चपलेने चोप देत त्याचे कपडे फाडून चांगलीच अद्दल घडवली. ​पवनी तालुक्यातील वडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून ही एकशिक्षकी शाळा आहे. गेल्या पाच वर्षांपासून येथे अनिल जगन राऊत (वय ५४) हा शिक्षक कार्यरत होता. मात्र, ज्ञानदान करण्याऐवजी हा शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवायचा आणि त्यांच्याशी अश्लील चाळे करून अत्याचाराचा प्रयत्न करायचा. ​शाळेतील जवळपास सर्वच मुलींसोबत या नराधमाने अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जेव्हा हा प्रकार पालकांच्या कानावर आला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी भरचौकात कपडे फाडून केली मारहाण आज ​मंगळवारी सकाळी संतप्त पालकांनी आणि ग्रामस्थांनी शाळेवर धडक दिली. शिक्षकाला जाब विचारल्यानंतर पालकांचा संयम सुटला. संतप्त महिलांनी या नराधमाला चपलेने बदडले, तर आक्रमक पुरुषांनी त्याचे कपडे फाडून त्याला भरचौकात आणले आणि चांगलाच चोप दिला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून शिक्षकाच्या या कृत्याचा सर्वस्तरातून निषेध होत आहे. दरम्यान ​तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, अनिल राऊत हा सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. पाच वर्षांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील गवराळा शाळेत असतानाही त्याने विद्यार्थिनींसोबत असाच अश्लील प्रकार केला होता. त्या वेळी लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबनानंतर त्याची बदली वडेगाव येथे झाली, मात्र त्याने आपल्या विकृत मानसिकतेत कोणताही बदल केला नाही. सध्या पवनी पोलिस ठाण्यात या नराधम शिक्षकाविरोधात कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा विकृत शिक्षकाला कायमचे बडतर्फ करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर