ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती!:अंबादास दानवेंनी फुंकले ट्रॅक्टर आंदोलनाचे रणशिंग; मराठवाड्यात मंगळवारी आंदोलन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे हिंगोली जिल्हा दौऱ्यात सरकाराच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत कर्जमुक्तीसाठी मराठवाड्यात मंगळवारी ता. १६ सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली आहे,. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्यासाठी हे आंदोलन छेडले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी ता. १४ बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर सडकून टीका केली. सरकारची कर्जमाफी नसून प्रत्यक्षात ‘कर्ज वसुली योजना’ आहे. सरकार सांगते की ठराविक रक्कम भरल्यानंतरच ५० हजार रुपये माफ होतील, अशा अनेक जाचक अटी यामध्ये घालण्यात आल्या आहेत. “उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अटींशिवाय कर्जमुक्ती केली होती, मात्र विद्यमान सरकारने दिलेले ‘सातबारा कोरा’ करण्याचे आश्वासन पाळले नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी केला. कर्जमुक्तीच्या प्रश्‍नावर मराठवाड्यातील आठही जिल्हयांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर तर छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर मंगळवारी ता. १६ ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. “नको अटी, नको शर्ती, आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती” ही या आंदोलनाची मुख्य घोषणा (टॅगलाईन) असणार आहे. हे आंदोलन केवळ मराठवाड्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे; अपण केवळ मराठवाड्यासाठीच्या आंदोलनाची घोषणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी निदर्शने आणि ‘रास्तारोको’ सारखी आंदोलने करण्यात आली होती. मात्र, आता शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि श्रमाचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचेही दानवे यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचा हा दौरा महत्त्वाचा आहे. हिंगोली जिल्हा हा शिवसेनेचा संघटनात्मकदृष्ट्या मजबूत जिल्हा असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची बांधणी करणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर