ईडीने धाड टाकलेल्या सातारा जिल्ह्यातील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेतील तब्बल ११२ कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकातदादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचा पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याचा खळबळजनक आरोप बँकेच्या ठेवीदार, कर्जदार संघटनेचे वकील निलेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि घोटाळ्यातील आरोपी महेशकुमार जाधव हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील ॲड. जाधव यांनी केली. भाजप नेत्यांकडून आरोपींची वकिली यशवंत बँकेच्या ठेवीदार, कर्जदार संघटनेचे वकील निलेश जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले. ॲड. जाधव म्हणाले की, भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडें हे यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगावकर आणि तत्कालिन चेअरमन महेशकुमार जाधव यांना राजाश्रय देत आहेत. भाजप नेते त्यांची एकप्रकारे वकिली करत आहेत. त्यामुळेच या मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत ११२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. याप्रकरणी ५० जणांवर एमपीआयडी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला असतानाही पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली आहे. उर्वरीतांना पोलिसांनी अभय दिले आहे. केवळ चार जणांना अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. उर्वरीत आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी ठेवीदार, कर्जदार संघटनेच्यावतीने ॲड. जाधव यांनी केली. ईडीकडून अधिकृत माहिती दिली जात नाही आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची गेली पाच दिवस मुंबई चौकशी सुरू असल्याचा दावा ॲड. जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, ईडीकडून अधिकृत माहिती दिली जात नाही. चरेगावकर यांचे बंधू विठ्ठल उर्फ शौनक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, बाकी सर्व आरोपी हे उजळ माथ्याने फिरत आहेत, असेही ॲड. जाधव म्हणाले. घोटाळ्यातील आरोपी झेडपीसाठी इच्छुक आर्थिक घोटाळ्यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली आहे. आरोपी आणि संशयास्पद कर्जप्रकरणे नावावर असणाऱ्यांना ईडीने नोटीसा बजावल्या आहेत असे असताना घोटाळ्यातील आरोपी आणि तत्कालिन चेअरमन महेशकुमार जाधव यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास यशवंत बँक ठेवीदार, कर्जदार संघटना आक्रमकपणे प्रचार करणार असल्याचा इशाराही ॲड. निलेश जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, यशवंत बँक आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांचीही ईडीने चौकशी केलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कराडच्या नवीन शासकीय विश्रामगृहाची देखभाल करत आहेत. कसलेही टेंडर न काढता मागील एक दीड वर्ष त्यांना देखभालीचे काम बांधकाम विभागाने दिले असल्याची खळबळजनक माहिती ॲड. जाधव यांनी दिली. तसेच नंतर टेंडरसाठी शार्दुल चरेगावकर यांनी बोगस कागदपत्रे दिली असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. त्याबद्दलही आमचा लढा सुरू असल्याचे ॲड. निलेश जाधव यांनी सांगितले.
112 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी झेडपीसाठी इच्छुक:आरोपींना वाचवण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचा दबाव, कर्जदार संघटनेच्या वकिलांचा गंभीर आरोप
-
By सुरेश पाचभाई
- January 19, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी?:समन्स देणे...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजितदादांसह सुनेत्रा पवारांचाही फोटो गायब!:पक्ष...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
वसमत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार:राजदरी येथील एका...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा:एका मंत्र्याने मागितले दुसऱ्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रासाठी कलंक:भोंदू बाबाशी सत्ताधाऱ्यांचे...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- March 29, 2026
